Tarun Bharat

आनंद अकादमी, नीना स्पोर्ट्स, हुबळी संघ विजयी

केएससीए सेकंड डिव्हीजन स्पर्धा : माजीद मकानदार, संतोष सुळगे पाटील यांची 312 धावांची भागीदारी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने सीसीआय धारवाड संघाचा 36 धावांनी, आनंद क्रिकेट अकादमी संघाने भटकळ स्पोर्ट्स क्लबचा 9 गडय़ांनी, नीना स्पोर्ट्स संघाने इंडियन बॉईज संघाचा 338 धावानी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. माजीद मकानदार, संतोष सुळगे पाटील (नीना स्पोर्ट्स), पुनीत बसवा, ओंकार देशपांडे (आनंद) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

हुबळी येथे हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने  50 षटकात 8 बाद 222 धावा केल्या. त्यात पुनीत बसवाने 10 चौकारासह 70, मणिकांत बुकीटगारने 11 चौकारासह 71, हर्ष जाधवने 25, अनमोल पागदने 12 धावा केल्या. सीसीके ब संघातर्फे अभिनव कुलकर्णीने 33 धावात 5, शामसुंदर डी.ने 2, विशालने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीआय ब संघाचा डाव 43.5 षटकात 186 धावात आटोपला. किशोर शेट्टीने 1 षटकार, 5 चौकारासह 52, यासिर कुरबरने 37, अखिल एस. 36, श्रेयशने 17 धावा केल्या. हुबळीतर्फे विनीतने 35 धावात 3, पुनित बसवाने 20 धावात 2, मनीषने 23 धावात 2, सुजल पाटील, ऋषभ पाटील, विनायक पांडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

आरआयएस हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भटकळ स्पोर्ट्स क्लब संघाने 34.3 षटकात सर्वबाद 107 धावा केल्या. अस्लम खाटपाडीने 31, अब्दुल्लाने 26, हयात शेखने 16 धावा केल्या. आनंदतर्फे ओंकार देशपांडेने 17 धावात 5, संमेद बेल्लदने 26 धावात 3, केतज कोल्हापुरे व सचिन शिंदे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 24.3 षटकात 1 बाद 108 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. त्यात किसन मेघराजने 1 षटकार, 8 चौकारासह नाबाद 65, पीयूष गेहलोतने नाबाद 12 धावा केल्या. भटकळतर्फे महंमद इम्रानने 1 गडी बाद केला.

बेळगाव केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात नीना स्पोर्ट्स क्लबने 49.5 षटकात सर्वबाद 413 धावांचा डोंगर उभा केला. 4 बाद 34 अशी नाजुक स्थिती असताना माजीद मकानदार व संतोष सुळगे पाटील यांनी  पाचव्या गडय़ासाठी 312 धावांची भागीदारी डाव सावरला. माजीद मकानदारने 5 षटकार, 15 चौकारासह 154, संतोष सुळगे पाटीलने 10 षटकार, 20 चौकारासह 147 चेंडूत 190 धावा केल्या. तसेच दर्शन पाटीलने 24, विनित पाटीलने 11 धावा जमविल्या. इंडियन बॉईजतर्फे केदार खटावकरने 68 धावात 5, अशोक बाणीने 65 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईज संघाचा डाव 21.2 षटकात सर्व बाद 75 धावात आटोपला. उमेश यलगारने 29, प्रणव सोमण्णावरने 23, गौस हाजीने 13 धावा केल्या. नीनातर्फे विनायक कांबळेने 11 धावात 4, अंगदराज हित्तलमनीने 16 धावात 3, नरेंद मांगोरेने 21 धावात 2, अनिकेत लोहारने 1 गडी बाद केला.

Related Stories

कॅन्टोन्मेंटचे कामकाजही आता ऑनलाईन

Patil_p

विद्युत रोषणाईमुळे प्रशासकीय इमारतीने वेधले लक्ष

Amit Kulkarni

भाजीपाल्याच्या दरात घट

Patil_p

सहकार्य समाजाचे कर्तव्य युवा समितीचे

Tousif Mujawar

बेळगावला कोरोनाचा धोका वाढला

Patil_p

रविवार पेठ बनले क्रिकेटचे मैदान

Omkar B