Tarun Bharat

आनंद-गिरी सहावी लढत बरोबरीत

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची दुसऱया स्थानी घसरण, कार्लसनची अव्वलस्थानी झेप

स्टॅव्हेन्जर-नॉर्वे / वृत्तसंस्था

भारताचा अनुभवी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत नेदरलँड्सच्या अनिश गिरीविरुद्ध बरोबरी प्राप्त केली. उभय ग्रँडमास्टर्समधील क्लासिक लढत बरोबरीत राहिल्याने आर्मागेडॉनचा (सडनडेथ टायब्रेक) अवलंब केला गेला. पण, त्यातही कोंडी कायम राहिली आणि उभयतांना गुण विभागून देण्यात आले.

या निकालासह आनंद 11.5 गुणांसह दुसऱया स्थानी घसरला. सहाव्या फेरीतील अन्य लढतीत विद्यमान जगज्जेता मॅग्नस कार्लसनने अझरबैजानच्या शखरियार मेमेद्यारोव्हविरुद्ध दमदार विजय मिळवत 12.5 गुणांसह अव्वलस्थानी झेप घेतली.

सहाव्या फेरीत प्रारंभी काळय़ा मोहऱयांनी खेळत असलेल्या आनंदने गिरीविरुद्ध 35 चालीअखेर बरोबरी मान्य केली. ही लढत इंग्लिश व्हेरिएशनने खेळवली गेली. आर्मागेडॉनमध्ये उभयतात 45 चालीनंतर बरोबरीची पुनरावृत्ती झाली. आर्मागेडॉनमधील नियमानुसार, लढत बरोबरीत राहिल्यास काळय़ा मोहऱयांनी खेळणाऱया ग्रँडमास्टरला विजयी घोषित केले जाते.

या स्पर्धेत मागील फेऱयांमध्ये कार्लसनला पराभवाचा धक्का देणाऱया विश्वनाथन आनंदसमोर आता आठव्या फेरीत तैमूर रॅझबोव्हचे आव्हान असेल. सहाव्या फेरीत नॉर्वेच्या कार्लसनने अझरबैजानच्या मेमेद्यारोव्हला 56 चालीत नमवले. दिवसभरातील अन्य लढतीत फ्रान्सच्या लॅग्राव्हेने चीनच्या हाओ वांगला सडनडेथ टायब्रेकमध्ये नमवले तर अमेरिकेचा वेस्ले सो नॉर्वेच्या आर्यन तारीविरुद्ध सरस ठरला. व्हॅसेलिन टोपालोव्ह व रॅझबोव्ह यांच्यातील आर्मागेडॉन लढत बरोबरीत राहिली.

Related Stories

संजित, सचिन कुमार यांना पहिल्या फेरीत पुढे चाल

Patil_p

मिथुन मंजुनाथ, अश्मिता यांचा वरिष्ठांना धक्का

Patil_p

बलबिर सिंग सिनियर यांना राष्ट्रीय सन्मान मिळावा

Patil_p

जयपूर पिंक पँथर्सच्या विजयात देसवालची चमक

Patil_p

नवे खेळाडू राष्ट्रीय संघाशी प्रतारणा करतात

Patil_p

आयसीसी अध्यक्ष निवड प्रक्रियेची दिशा आज ठरणार

Patil_p