Tarun Bharat

आनेवाडीच्या जिल्हा बँकेत सोशल डिस्टनसचा फज्जा

दिवसानुसार गावांना वेळ देण्याची गरज

वार्ताहर/ आनेवाडी

कोरोनाला रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असताना सर्वच सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी व संचारबंदी राबविण्यासाठी प्रशासन झटत आहे. त्यासाठी सार्वजनिक बँकांना वेळेचे बंधन घातले असून यावेळी होणारी गर्दी टाळून कामकाज करण्याच्या सूचना बैंकेच्या प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या आनेवाडी शाखेत मात्र सोशल डिस्टनसचा फज्जा उडाला आहे.

ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेत शेतकरी व ग्रामस्थांची आर्थिक देवान-घेवान होत असते. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी स्थानिक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, परंतु आनेवाडी, रायगाव, महामुलकरवाडी, मालुसरेवाडी, मर्ढे, वीरमाडे या गावातील लोकांची मोठय़ा प्रमाणात खाती आहेत. या गावातील लोकांची मोठय़ा प्रमाणात बँकेत गर्दी होत असते. यावर शाखेचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने बँकेच्या दारात नेहमीच गर्दी पाहायला मिळते आहे. त्यात बँकेची वेळ सकाळी 8 ते 11 असल्याने ग्राहक देखील गर्दी करीत आहेत.

 या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जसे तालुक्यातील करहर, मेढा शाखेच्या वतीने गावांनुसार बँकेचे कामकाज चालू आहे, अश्याच पद्धतीने आनेवाडी शाखेत देखील प्रत्येक गावाला एक दिवस दिला तर गर्दी कमी होण्यास मदत होईल. कामा व्यतिरिक्त ही अनेकजण बँकेत बऱयाचदा आलेले असतात. अश्या लोकांवर अधिकारी व कर्मचाऱयांनी वचक ठेवण्याची गरज असून गावचे पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचाऱयांनी वारंवार सूचना करून ही गर्दी कमी होत नाही.  

Related Stories

”कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल”

Archana Banage

तीन हजारांची लाच घेताना वडूजचा सर्कल ताब्यात

Patil_p

केंद्राच्या ‘त्या’ प्रस्तावामुळे गरीब,मध्यमवर्गीयांना वीज वापर ही चैनीची वस्तू ठरेल

Tousif Mujawar

गावच्या विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडा

Patil_p

साताऱयात चोरटय़ाकडून 50 मोबाईल हस्तगत

Patil_p

अब्दुल लाटच्या कन्येची पॅरिस मधील भारतीय दूतावासमध्ये द्वितीय सचिवपदी नियुक्ती

Archana Banage