Tarun Bharat

आपतर्फे आणखी पाच उमेदवार जाहीर

आज जाहीर करणार मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

प्रतिनिधी /पणजी

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने मंगळवारी पाच उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, मडगावात लिंकन वाझ, प्रियोळमधून नानू नाईक, कुडचडेतून गॅब्रिएल फर्नांडीस, केपेत राहुल परेरा आणि मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या सांखळीतून मनोज घाडी आमोणकर यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. डिचोली मतदारसंघात स्वतःचा उमेदवार न ठेवता अपक्ष निवडणूक लढणाऱया डॉ. चंद्रकांत शेटय़े यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

पक्षाच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी ही यादी जाहीर केली आहे. त्यासंबंधी ट्विट करताना त्यांनी, ’गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर करताना आपणाला अत्यानंद होत असल्याचे म्हटले आहे. गोव्यातील राजकीय परिवर्तनाच्या या सर्व ध्वजधारकांचे त्यानिमित्त अभिनंदन आणि विजयासाठी त्यांना शुभेच्छा, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

आज जाहीर करणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज गोव्यातील पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱयाची घोषणा करणार आहेत. केजरीवाल यांचे काल मंगळवारी सायंकाळी गोव्यात आगमन झाले असून दरम्यानच्या काळात त्यांनी राज्यातील विविध नेत्यांच्या भेटी घेऊन प्रचार रणनीतिसंबंधी चर्चा केली. आज बुधवारी सकाळी केजरीवाल दोनापावला येथे पत्रकारांना संबोधित करणार असून त्यावेळी गोव्यातील पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार आहेत, अशी माहिती आपमधील सूत्रांनी दिली आहे.

Related Stories

50 वर्षांनंतर वास्कोतील गांधीनगरवासियांना लाभला पक्का डांबरी रस्ता

Amit Kulkarni

मोप विमानतळ, इस्पितळाचे मोदींच्याहस्ते 11 रोजी लोकार्पण

Patil_p

केरी सत्तरीत घरावर झाड कोसळून नुकसान

Amit Kulkarni

म्हापसा नगरी शिमगोत्सव मिरवणुकीने दुमदुमली

Omkar B

बोरी स्वामी विवेकानंद महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Amit Kulkarni

कोरोनाचे तांडव : तब्बल 30 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!