Tarun Bharat

आपत्कालीन परिस्थितीसाठी सातारा पालिकेची हेल्पलाईन सेवा

सातारा / प्रतिनिधी : 

सातारा शहरात आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहचविण्यासाठी सातारा पालिकेने अहोरात्र चालणारी नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे. खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी या हेल्पलाईनच्या कामात पुढाकार घेतला.

02162-232686-101 ही नवीन हेल्पलाईन सातारा पालिकेने सुरू केली आहे. या हेल्पलाईनची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात नमूद आहे की, सध्या सातारा शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. दरड कोसळणे, रस्ता खचणे अथवा वाहून जाणे, वृक्ष उन्मळून पडणे, धोकादायक इमारत कोसळणे आदी स्वरूपाच्या आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी आपत्ती घडल्यास नागरिकांनी वरील हेल्पलाईनवर संपर्क साधावयाचा आहे. हा संपर्क क्रमांक 24 x 7  सुरू राहणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कळविले आहे.

Related Stories

रेखा वहिनींचे कामच भारी..

datta jadhav

सातारा : रूग्णांचा आकडा हजारासमीप

Archana Banage

पॉवर हाऊसनजिक जलवाहिनीला गळती

Patil_p

अनुकंपा भरतीबाबत चौकशीचे आदेश

Patil_p

सातारा पालिकेच्या कुपर कॉलनीतील बहुउद्देशीय हॉलची मलई जातेय कुठे?

Patil_p

सातारा जिल्ह्यात ६२९ जण कोरोनाबाधित ; तर ३१ नागरिकांचा मृत्यू

Archana Banage