Tarun Bharat

आपले वोझे घालू नये ! कोणीयेकासी !!

संपूर्ण सृष्टीमध्ये अनेक जीव-जंतू, पशु-पक्षी आणि प्राणी आहेत. वरवर पाहता सामान्य मनुष्याला या सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे की नाही याविषयी शंका असू शकते. पण जो जाणकार आहे ज्याची निरीक्षण शक्ती आणि आत्मिक शक्ती उच्च दर्जाची आहे त्याला या सर्वांचा परस्पर संबंध कळतो. या सर्व सजीव घटकांचे एकमेकांवरचे अवलंबित्व हे सूक्ष्म अभ्यासांती जाणवते. या सर्व प्रक्रियेत मानसिकरीत्या हे सजीव घटक एकमेकांवर कसे अवलंबून आहेत याचा पण विचार होणे गरजेचे आहे.

ज्याने स्वतःला पूर्णपणे जाणले आहे आणि जो सृष्टीतील प्रत्येक घटकाकडे समदृष्टीने बघू शकतो त्यालाच ह्या जीवसृष्टीचे मर्म कळू शकते. तसेच रहस्यमय पद्धतीने यात होणारे बदलही असा ज्ञानी व्यक्ती समजू शकतो. प्रत्येक मनुष्याला असे ज्ञान प्राप्त होईलच असे नाही. किंबहुना ते शक्मयही नाही.

जगाच्या  इतिहासात आपण डोकावून बघितले तर हजारो वर्षांतून एखाद-दुसरी व्यक्ती अशी समदृष्टी प्राप्त झालेली आपल्याला जाणवून येईल. सुदैवाने आपल्या देशात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी हे समदृष्टी आणि विश्वव्यापक दृष्टिकोन प्राप्त झालेले महापुरुष होऊन गेले.

ज्यांचा दृष्टिकोन विशाल असतो त्यांनाच वस्तुनि÷ पद्धतीने व्यवस्थापन कसे आचरणात आणावे हे कळते. वस्तुनि÷ व्यवस्थापन ही अशी एक प्रक्रिया असते ज्या माध्यमातून संघटनेतील, संस्थेतील वरि÷ आणि कनि÷ व्यवस्थापक संस्थेची एकत्रित उदिष्टय़े ठरवू शकतात. प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षित असलेल्या कामाचा परिपूर्ततेचा विचार करून त्या त्या व्यक्तीच्या जबाबदारीची प्रमुख क्षेत्रे निर्धारित केली जातात. या उपायांच्या सहाय्याने उपक्रमाचे संचालन करत संघटनेतील प्रत्येक घटक आणि प्रत्येक व्यक्तीने केलेल्या योगदानाचे मूल्यांकन केले जाते.

व्यवस्थापनात ठरवलेले उद्दिष्टय़ साध्य करताना कर्मचाऱयाना अनेक वेळा गटांमध्ये काम करावे लागते. कार्यालयात कर्मचाऱयांच्या विचारांच्या होणाऱया देवाण-घेवाणीच्या प्रक्रियेला गट प्रभाव असे म्हणतात. एखादी व्यक्ती संस्थेत एकटी असताना किंवा गटात असताना त्या व्यक्तीच्या वागणुकीत फरक असतो. कर्मचाऱयांच्या भौतिक तसेच नैतिक वर्तनात त्यांच्या गटांचा परिणाम होत असतो. या गटप्रभावाचा आणि कर्मचाऱयांच्या वर्तनाचा अभ्यास व्यवस्थापकास करणे आवश्यक असते. व्यवस्थापक जेव्हा कर्मचाऱयाशी सुसंवाद साधतो किंवा विचारांचे आदान-प्रदान करतो, त्यावेळी गट प्रभावाच्या परिणामानुसार त्याचा दृष्टिकोन ठरवणे गरजेचे असते. समर्थांनी गट प्रभावाविषयी श्रीमद दासबोधात स्पष्टपणे सांगितले आहे ते असे की,

शोच्येवीण असो नये !

मळीण वस्त्र नेसो नये !

जाणारास पुसो नये !

कोठे जातोस म्हणौनी !!

व्यापकपण सांडू नये !

पराधेन होऊ नये !

आपले वोझे घालू नये !

कोणीयेकासी !! 02/02/18-19

म्हणजे, शरीराची स्वच्छता हवी. अंगावरची वस्त्रे कळकट-मळकट असू नये. जाणाऱयाला कुठे जातोस म्हणून विचारू नये. मनाचा व्यापकपणा सोडू नये. पराधीन होऊ नये. आपले वोझे इतरांवर घालू नये.

व्यवस्थापनाच्या दृष्टीने या ओव्यांमध्ये असे जाणवते की, गटात काम करत असताना आपले वर्तन शुद्ध हवे. कुणाही विषयी मनात कपट-द्वेष असू नये. जर एखाद्या सहकाऱयाची प्रगती होत असेल तर त्यास आडकाठी घालू नये. स्वतःमध्ये विशाल दृष्टिकोन वाढवावा. आपली कामे इतरांवर ढकलून देऊ नये. आपल्या सहकाऱयांना गृहीत धरू नये. स्वतःचे कर्तव्य उत्तम रीतीने निभवावे. इतरांवर आपल्या कामाचा भार टाकू नये.

सर्व कामे सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व्यवस्थापकाकडून तयार करण्यात येणाऱया गटाला औपचारिक गट असे म्हणतात. व्यवसायवृद्धी करिता औपचारिक गट तयार करण्यात येतात.  प्रत्येक व्यक्तीची कार्ये यात औपचारिकरित्या ठरवली जातात. अधिकारी, कर्मचारी यांचे कार्य आणि परस्पर संबंध दर्शविणारा आराखडा तयार करून परिस्थितीनुसार त्यात बदल आणि सुधारणा केल्या जातात.

जसे काही औपचारिक गट असतात तसेच काही अनौपचारिक गटही व्यवस्थापनात कार्यरत असतात. कामाच्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या औपचारिक गटातूनच अनौपचारिक गटांची निर्मिती होत असते. व्यवसाय संस्थेतील औपचारिक गटांमध्ये समप्रवृत्तीच्या व्यक्तींचे उत्स्फूर्तपणे निर्माण झालेले किंवा केलेले गट म्हणजेच अनौपचारिक गट होय. या गटात आपुलकीचे, जवळीकतेचे आणि भावनात्मक संबंध असतात. अनौपचारिक गटात कर्मचाऱयांची विचार करण्याची पद्धती सारखीच असते. मैत्री आणि सलोख्याचे संबंध निर्माण करून त्या गटांचा प्रभाव संबंधित कार्यावर केला जातो. या अनौपचारिक गटातून सभासदांच्या किंवा कर्मचाऱयांच्या गरजा भागवल्या जातात. त्यामुळे गटातील त्रुटीसुद्धा दूर होतात. प्रत्येक व्यवस्थापकाला अशा गटांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्यांची कार्यशक्ती औपचारिक उद्दिष्टय़े साध्य करण्याकडे वळवावी लागणे गरजेचे असते.

अनौपचारिक गट हा प्रामुख्याने भावनात्मक संबंधांवर आधारित असल्याने या गटाचे भवितव्य हे औपचारिक गटाच्या तुलनेने खूप कमी असते. त्यामुळे त्यात जर काही असंतुष्ट किंवा मानसिकरीत्या दुर्बळ कर्मचाऱयांचा समावेश असेल तर तेथे एक अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊन संस्थेला किंवा संघटनेला वाईट दिवस येऊ शकतात. याविषयी समर्थ म्हणतात की,

अज्ञान आणि अविस्वासी !

छळवादी आणि दोषी !

अभक्त आणि भक्तांसी !

देखो सकेना !! 02/03/12

म्हणजे, स्वतः अज्ञानी असून दुसऱयाकडून जाणून घेण्याची इच्छाही नाही. दुसऱयाला छळणे आणि त्यावर दोष लावणे. सत्कर्म न करता दुसऱयाची निंदा-नालस्ती करणे. स्वतःच्याच कर्मामुळे दु:खी-कष्टी होणे. स्वतः यातना भोगूनही दुसऱयाचा मत्सर करणे. असे हे लोक संस्थेलाच घातक नसून समाजालाही घातक असतात. म्हणून अशा विकृत मानसिकतेच्या लोकांपासून उत्तम व्यवस्थापकांनी सावध राहावे.

माधव किल्लेदार

Related Stories

नाग्या सूड उगवतो

Patil_p

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (12)

Patil_p

झाले गेले विसरुन जाऊ…

Patil_p

डिजिटल आर्थिक व्यवहार व सुरक्षा : ई-वॅलेट – भाग 3

Patil_p

पूर्वीं देखिला न ऐकिला

Patil_p

शेतकऱयांचे ऐका

Patil_p