Tarun Bharat

आपही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार

पत्रकार परिषदेत रोमी भाटी यांची माहिती

प्रतिनिधी /बेळगाव

दिल्ली राज्याचे सरकार यशस्वीपणे आपने चालविले आहे. शिक्षण, आरोग्य व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळले आहे. आपचे सर्व्हेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता संपूर्ण देशामध्ये आपला पक्ष विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली राज्य यशस्वीपणे सांभाळल्यामुळे जनतेचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे आता कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील आप लढविणार असल्याची माहिती आपचे राज्य निरीक्षक रोमी भाटी यांनी दिली.

महापालिका, जिल्हा पंचायत, तालुका पंचायतच्या निवडणुका आप लढविणार आहे. आमचा अजेंडाच भ्रष्टाचार विरोधी आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱयांना आम्ही कधीच थारा देणार नाही. बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत जी कामे झाली नाहीत त्या विरोधातही आम्ही आवाज उठविणार असून दिल्ली सरकारने संपूर्ण वीज पुरवठा मोफत दिला आहे. अशाच प्रकारे इतर राज्यांमध्येही आम्ही वीज, आरोग्य या सेवा पुरविणार असल्याचे रोमी भाटी यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील प्रत्येक जिल्हय़ाला भेट देवून कार्यकर्त्यांशी चर्चा केली जात आहे. बेळगावमधील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठीच मी येथे आलो आहे. यापुढे प्रत्येक निवडणूक स्वबळावर आप लढविणार असल्याचे सांगितले. यावेळी बेळगावचे आपचे निरीक्षक संतोष नरगुंद, शहराचे उपाध्यक्ष गिरीश बाळेकुंद्री, संचालक अरविंद कापाडिया, जिल्हा समन्वयक संजय काकतकर, महिला आघाडीच्या ऍड. पूजा काकतकर, सेपेटरी अब्दुल शेख, महावीर अनगोळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर सर्कल येथे ऑक्सिजन बँकेत 5 नवीन बेड्सची सुविधा

Amit Kulkarni

बसुर्ते गावातील प्रवाशांची बसअभावी कुचंबणा

Amit Kulkarni

रस्त्यात ठाण मांडून बसलेली मोकाट जनावरे

Patil_p

शहर परिसरात संक्रांत साजरी

Amit Kulkarni

राजहंसगड गावातील नळपाणी योजनेच्या अपुऱ्या कामामुळे नागरिकांतून संताप

Amit Kulkarni

25 ऑक्टोबर रोजी कोणत्याही प्रकारची सुनावणी नको

Patil_p