Tarun Bharat

आप्पाचीवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध

वार्ताहर/ कुर्ली

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीमधून निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील व अरिहंत उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समविचारी ग्रामविकास आघाडीच्या 5 उमेदवारांनी विजय मिळविला आहे. समविचारी आघाडीच्या माध्यमातून आप्पाचीवाडी परिसराच्या विकासासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन या सदस्यांनी केले.

या निवडणुकीत वॉर्ड क्र. 2 मधून लक्ष्मण रामा आबणे यांनी 407, उज्ज्वला बाळासाहेब गारगोटे 279, आप्पासाहेब गणपती माने 327, वॉर्ड क्र. 3 मधून सुमित्रा शहाजी माने 188, कृष्णात महादेव पोटले 229 मते घेऊन ग्रा. पं. सदस्य म्हणून निवडून आले. चुरशीने झालेल्या या निवडणुकीत आप्पाचीवाडी येथील 8 पैकी 5 जागांवर ग्रामविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.

मतदारांनी या निवडणुकीत आपणास बहुमताने निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासास पात्र राहून पुढील पाच वर्षात आप्पाचीवाडी ग्रा. पं. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे मनोगत लक्ष्मण आबणे, उज्ज्वला गारगोटे, आप्पासाहेब माने, सुमित्रा माने, कृष्णात पोटले या नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांनी व्यक्त करून मतदारांचे आभार मानले.

Related Stories

आगीत दोन दुकाने खाक, 9 लाखाचा फटका

Patil_p

जारकीहोळींचा गोकाक, रामदुर्गमध्ये प्रचार

Amit Kulkarni

अवकाळीने बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

Amit Kulkarni

चव्हाट गल्लीत सॅनिटायझरची फवारणी

Amit Kulkarni

तिसरे गेट उड्डाणपुलासाठी बिम घालण्याचे काम सुरू

Patil_p

सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय कोटय़ात वाढ

Amit Kulkarni