दोडामार्ग / वार्ताहर:
पिकुळे गावचे उपसरपंच आप्पा वसंत गवस यांनी आपल्या उपसरपंच पदाचा काल राजीनामा दिला. वैयक्तिक कारणामुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे श्री. गवस यांनी स्पष्ट केले. तर त्यांचा राजीनामा प्राप्त झालेला असून तो मासिक सभेत ठेवला जाईल असे सरपंच दीक्षा महालकर यांनी सांगितले. आप्पा गवस हे भाजपाचे युवा पदाधिकारी होते.


previous post