शिरोळ प्रतिनिधी
मोटरसायकलला तीन चाकी आपे रिक्षाने धडक दिल्याने मोटरसायकलवरील लक्ष्मी आप्पासो मडिवाळ (वय 27 )रा. शिरढोण या जागीच मयत झाल्या तर विशाल मच्छिंद्र सुतार (वय 25) रा. शिरढोण हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शिरढोण-टाकवडे रोडवरील हनुमान बेकरी जवळ घडली.
पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, विशाल सुतार व लक्ष्मी मडिवाळ हे मोटरसायकलने शिरढोणहुन टाकवडेकडे जात असताना समोरून मालवाहतूक करणाऱ्या तीन चाकी आपे रिक्षाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की मागे बसलेल्या लक्ष्मी मडिवाळ या जागीच ठार झाल्या तर मोटरसायकल चालत विशाल सुतार हा गंभीर जखमी झाला असून त्याला इचलकरंजी येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. आप्पे रिक्षा चालक अपघात घडताच फरारी झाला. सदर अपघाताची फिर्याद श्रीधर रघुनाथ सुतार यांनी शिरोळ पोलिसात दिली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.