Tarun Bharat

‘आप’ च्या योजनांमुळे पणजीकर प्रभावित

वाल्मिकी नाईक यांच्या घरोघरी भेट मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी /पणजी

वीज दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या गोमंतकीयांना आम आदमी पार्टीच्या वीज हमी आश्वासनामुळे दिलासा मिळाला असल्याचे मतदारांच्या घरोघरी भेटीदरम्यान दिसून येत आहे. पक्षाचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी सध्या राजधानी पणजी शहरासह संपूर्ण मतदारसंघात घरोघरी भेटी देण्याची मोहीम चालविली आहे. त्या दरम्यान त्यांना सदर अनुभव आला.

आम आदमी पार्टी सध्या संपूर्ण राज्यभरातील लोकांपर्यंत पोहोचत आहे. आम आदमी पाटीची गोव्याबद्दल दृष्टी आणि खास करून अरविंद केजरीवाल यांनी दिलेली वीज हमी मतदारांना पसंत पडत आहे. त्याशिवाय मतदारांवर सर्वात जास्त परिणाम करणाऱया समस्यांविषयीही श्री. नाईक त्यांच्याशी बोलत आहेत. लॉकडाऊन व महामारी काळात आप ने केलेली मदत प्रशंसनीय होती, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

पणजीतील रहिवाशांनी सांगितले की, कोविड महामारीच्या काळात त्यांचे आमदार त्यांना विसरले होते. अशा कठीण प्रसंगी आप कडून अनेक गरजवंतांना उच्च प्रतिचे रेशन मोफत प्रदान करण्यात आले. त्याबद्दल सर्वांनी आपच्या दातृत्वाचे कौतूक करत आभार व्यक्त केले. त्याशिवाय आप पक्षाने वैद्यकीय मदतही केली तसेच घरोघरी भेटी देऊन ऑक्सिमिटर तपासणी मोहिमेद्वारे मदत केली, याचाही मतदारांवर फारच प्रभाव पडल्याचे दिसून आले.

आमच्या घरोघरी मोहिमेला पणजीत जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्याद्वारे आता केवळ आम आदमी पार्टीलाच संधी द्यायची असा निर्धार लोकांनी केल्याचेही या भेटीदरम्यान जाणवले, अशी माहिती श्री. नाईक यांनी दिली.

Related Stories

गोमंतकीयांनी पंतप्रधान मोदींचे हात बळकट राहवे

Amit Kulkarni

कोरोना वाढतोय, दक्षता बाळगा!

Amit Kulkarni

रणमाले महोत्सवामुळे पारंपरिक कलेला नवीन आयाम

Amit Kulkarni

शनिवारी कोरोनाचे आठ बळी

Patil_p

म्हादईच्या रक्षणासाठी जनचळवळच हवी : सरदेसाई

Amit Kulkarni

डय़ुरंड चषकावर एफसी गोवाने कोरले आपले नाव !

Amit Kulkarni