Tarun Bharat

आफ्रिकेत ‘इबोला’मुळे 4 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनानंतर आता आफ्रिकेत ‘इबोला’ विषाणूने डोके वर काढले आहे. आफ्रिकेतील काँगो देशात ‘इबोला’चे सहा रुग्ण आढळले असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतची माहिती दिली आहे. 

एप्रिलमध्ये बेनी शहरात इबोलाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता इबोला पश्चिम शहरातल्या माबंडाकापर्यंतही पसरला आहे. दोन शहरांमध्ये सुमारे 620 मैलांचे अंतर आहे. काँगोमधील इबोलाचा हा 11वा उद्रेक आहे. काँगोचे आरोग्यमंत्री इतेनी लाँगोंडो म्हणाले की, माबाडाकामध्ये इबोलाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आम्ही तेथे लवकरच लस आणि औषधे पाठवणार आहोत. काँगोच्या इक्वेतेर प्रांतात सन 2018 मध्ये इबोलाचा उद्रेक झाला आणि 54 घटना नोंदल्या गेल्या. त्यामधील 33 लोकांचा मृत्यू झाला. काँगोमध्ये दोन नवीन लस वापरल्यानंतरही आतापर्यंत 2260 लोकांचा इबोला विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, काँगोमध्ये कोरोना संसर्गामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. येथे संसर्गाची 3000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 71 लोकांचा मृत्यूही झाला आहे.  डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, काँगो आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये चाचणी किट आणि इतर आरोग्य सुविधांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत संक्रमणाच्या बाबतीत अचानक वाढ होण्याची नोंद येथे नोंदविली जाऊ शकते. काँगोमध्ये खरसाचा प्रादुर्भाव देखील आहे. जानेवारी 2019 पासून 3,50,000 लोक खरसाने प्रभावित झाले आहेत, तर 6500 हून अधिक लोक मरण पावले आहेत. 

Related Stories

जेष्ठ साहित्यिक डॉ.गवस यांच्या मुलगा व मुलीच्या नावे व्हाट्सअप अकाउंट काढत अनेकांना फसविले

Archana Banage

मुंबई : नाईट क्लबवर पोलिसांचा छापा; क्रिकेटर सुरेश रैनासह 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tousif Mujawar

शांततेचा जप अन् युद्धाची तयारी

Patil_p

Sangli; आटपाडीत तीन घरफोड्या

Kalyani Amanagi

देशमुखांना दिलासा नाहीच; समन्स रद्द करण्यास कोर्टाचा नकार

datta jadhav

”उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं”

Archana Banage