Tarun Bharat

आमचे भाजपसोबत नळावरचं भांडण नाही – संजय राऊत

Advertisements

ऑनलाइन टीम तरुण भारत

भाजप आणि शिवसेना नेतेमंडळींचे आरोप – प्रत्यारोप सतत सुरूच असतात. पण, कधी-कधी या दोन्ही पक्षांचे नेते अशी काही वक्तव्ये करतात, ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटतं. अशाच प्रकारचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘भाजपचा नेहमीच विरोध करावा, असं नाही. त्यांच्या काही चांगल्या गोष्टी आम्ही घ्याव्यात, आमच्या चांगल्या गोष्टी त्यांनी घ्याव्यात’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याबाबत राऊतांना विचारलं असता त्यावर राऊत म्हणाले की, ‘आमचे भाजपसोबत नळावरचं भांडण नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक गोष्टीला विरोध आम्ही करणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.काही चांगल्या गोष्टी आम्ही घ्याव्यात, आमच्या चांगल्या गोष्टी त्यांनी घ्याव्यात’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

Related Stories

औरंगाबादमध्ये दिवसाच्या सुरुवातीलाच 17 नवे रुग्ण, एकूण संख्या 495 वर

Rohan_P

सांगली ते बारामती, कराड ते पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण कधी ?

Abhijeet Shinde

एनी डेस्क ऍपद्वारे सातारा, फलटणमध्ये फसवणूक

Patil_p

कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल ९९.६७ टक्के

Abhijeet Shinde

सोलापुरात नवीन तीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, बाधितसंख्या 114 वर

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा 400 पार, 21 नवे रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!