Tarun Bharat

आमटे ग्रा. पं. अध्यक्षपदी पार्वती नाईक

Advertisements

उपाध्यक्षपदी सविता गावकर यांची निवड

वार्ताहर / कणकुंबी

आमटे ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी हब्बनहट्टी गावच्या पार्वती काळू नाईक यांची तर उपाध्यक्षपदी आमटे गावच्या सविता अशोक गावकर यांची बिनविरोध निवड केली . मंगळवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी सर्व 9 सदस्य उपस्थित होते. आमटे ग्राम पंचायतीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने हब्बनहट्टी गावच्या श्रीमती पार्वती काळू नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तसेच उपाध्यक्ष सामान्य महिलेसाठी राखीव असल्याने या जागेसाठी सुद्धा आमटे गावच्या श्रीमती सविता अशोक गावकर यांचाही एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे अखेर अध्यक्ष म्हणून श्रीमती पार्वती काळू नाईक तर उपाध्यक्ष म्हणून श्रीमती सविता अशोक गावकर यांच्या नावाची घोषणा अधिकाऱयांनी केली. यावेळी आमटे, कालमणी, हब्बनहट्टी गावचे पंचायत सदस्य उपस्थित होते.

Related Stories

रोज पाच तास अभ्यास करून त्याने मिळविले यश

Patil_p

दुसरे रेल्वे गेट येथे बसविण्यात आले नवे फाटक

Amit Kulkarni

बेळगाव ही लोकमान्य टिळकांची कर्मभूमी

Nilkanth Sonar

महाविद्यालयीन प्रवेशासाठी मुदतवाढ

Patil_p

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 9 जानेवारीला भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni

हुंचेनट्टीतील क्रिकेट स्पर्धेत खादरवाडीचा शिवसेना संघ विजयी

Omkar B
error: Content is protected !!