Tarun Bharat

आमदारांनो असाल तिथून जयपूर गाठा…

Advertisements

ऑनलाईन टीम / जयपूर :

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बावीस आमदारांसह दिल्लीत ठाण मांडल्याने गेहलोत सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व आमदारांना असाल तिथून जयपूरला पोहचा, असा आदेश दिला आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन यांच्यात मागील काही दिवसांपासून वर्चस्ववाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी असतानाच शनिवारी रात्री पायलट 22 आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

अडचणीत आलेल्या गेहलोत यांनी आज सकाळी कॅबिनेटची बैठक बोलावली. या बैठकीत . ज्या आमदारांचा फोन लागणार नाही, त्यांच्यापर्यंत पोहचा, सरकारला वाचवण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे, असे आदेश मंत्र्यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सर्व आमदारांनाही असाल तिथून थेट जयपूरला हजर व्हा, असा आदेश दिला आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भाजपचे विधानसभेतील नेते गुलाबचंद कटारिया, उपनेते राजेंद्र राठोड आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया प्रयत्नशील असल्याचा आरोप गेहलोत यांनी शनिवारी केला होता.

Related Stories

“मोदी सरकारने दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचा अपमान केला”; राहुल गांधींची टीका

Abhijeet Shinde

बणजगोळ येथे दोन गटात मारामारी; १२ जणांवर गुन्हे दाखल

Sumit Tambekar

ठाकरे-फडणवीस यांच्यातील कलगीतुऱ्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

Abhijeet Shinde

रशियासोबत सुरू झाले ‘वॅक्सिन वॉर’…

datta jadhav

महाराष्ट्रात कन्टोनमेंट झोनबाहेर वॉटर स्पोर्ट्स, पर्यटन स्थळांना परवानगी

Rohan_P

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी मोडला विक्रम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!