Tarun Bharat

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींची 5 रोजी सुनावणी

Advertisements

काँग्रेस व मगो पक्षाची याचिका

प्रतिनिधी / पणजी

काँग्रेस आणि मगो पक्षातून भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या एकूण 12 आमदारांच्या अपात्रतासंबंधी पुढील सुनावणी सभापती राजेश पाटणेकर यांनी दि. 5 एप्रिल 2021 रोजी ठेवली असून काँग्रेस पक्षाच्या याचिकेवर दुपारी 3 वा. तर मगो पक्षाच्या याचिकेवर सायं. 4 वा. सुनावणी ठेवली आहे. यावेळी युक्तिवाद नव्याने ऐकून घेतले जातील की, थेट निवाडा वाचन होईल हे अजून स्पष्ट झालेले नाही.

 सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी मात्र दि. 6 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. पक्षांतर बंदी कायद्याखालील 1986 च्या नियमावलीप्रमाणे तसेच भारतीय घटनेच्या 10 व्या परिशिष्टाच्या कलम 2(1) बी खाली सदर नोटीस दि. 1 एप्रिल 2021 रोजी बजावण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सभापतींसमोर 10 आमदारांविरुद्ध दि. 8 ऑगस्ट 2018 रोजी अपात्रता याचिका सादर केली होती. या याचिकांवर सभापती सुनावणी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप लावून गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धांव घेतली. सदर याचिका अनेकवेळा सुनावणी आली पण उत्तर सादर उशीर होत असल्याने शेवटी न्यायालयाने तंबी देताच दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सभापती याचिका निकालात काढतील, असे सभापतींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला कळवले.

दि. 24 फेब्रुवारी रोजी सभापतींनी सर्वोच्च न्यायालयासमोर पुरवणी अर्ज सादर केला व आपल्याला दोन याचिकादार आणि 12 प्रतिवादी आमदारांची पूर्ण बाजू ऐकून घेतल्यानंतर निवाडा द्यायचा आहे व हे एकाच दिवशी शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाला कळवले. दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सभापतींनी सर्वांची बाजू ऐकून घेऊन निवाडा राखून ठेवला. ही सुनावणी रात्री 7.30 वा.पर्यंत चालली होती.

याचिकादार सुदिन ढवळीकर यांची उलटतपासणी घेण्याची संधी द्यावी असा अर्ज बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांच्या वकिलांनी केला होता. अशी संधी देता येते की नाही यावरही सभापतींनी निवाडा राखून ठेवला होता.

दि. 12 मार्च 2021 रोजी सकाळी सभापतींनी सुनावणीसाठी मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर यांना बोलावले होते. त्यादिवशी सभापतींनी पुरवणी याचिकेवर निवाडा देताना उलटतपासणी करण्यासाठी बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांची सादर केलेली पुरवणी याचिका फेटाळल्याचे जाहीर केले.

सर्वोच्च न्यायालयात 6 एप्रिल रोजी सुनावणी

अपात्रता याचिकेवर सभापती दि. 26 फेब्रुवारी रोजी अंतिम निवाडा देणार होते. निवाडा राखून ठेवण्यात आला आहे पण त्याचे वाचन कधी केले जाईल हे स्पष्ट न केल्याने आता सर्वोच्च न्यायालयाकडून विचारणा होण्याची शक्यता आहे. दि. 6 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिकेवर सुनावणी ठेवली असून सदर सुनावणी 13 व्या क्रमांकावर आहे.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची सूची जाहीर झाल्यानंतर आता सभापतींनी अपात्रता याचिकांवरील सुनावणी दि. 5 एप्रिल रोजी ठेवली आहे. या दिवशी निवाडा वाचन ठेवले आहे की नाही हे कुठेच स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Related Stories

शेल्डे येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

Amit Kulkarni

दाबोळी व चिखलीतील महामार्गाला जोडणाऱया रस्त्यासाठी संरक्षक भिंतीचे काम सुरू

Amit Kulkarni

स्थानिकांना रेती व्यवसाय करू द्यावा : कांदोळकर

Amit Kulkarni

भारतीय नौदल हवाई ‘स्क्वाड्रन 316’ 29 मार्च पासून कार्यान्वित

Amit Kulkarni

सुयश प्रभुदेसाईची आयपीएल लिलावासाठी निवड

Amit Kulkarni

मांगोरहिल कंटेनमेंट झोनवरील निर्बंध शिथील केल्याने समाधान, लोक बाहेर पडू लागले

Omkar B
error: Content is protected !!