प्रतिनिधी / हातकणंगले
धनगर समाज आरक्षणासाठी संघर्ष करीत असताना तालूक्यातील आमदार व खासदारांनी केवळ तोंडी पाठींबा देवून पूतणा मावशीचे प्रेम दाखविण्यापेक्षा वेळ काढून धनगर समाजाला अनुसूचीत जमातीमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करावा असा सूर धनगर समाजाने आयोजित केलेल्या चक्काजाम अंदोलनात घुमला. तालूक्यातील धनगर बांधवाच्यावतीने हातकणंगले बसस्थानकासमोर सांगली – कोल्हापूर रस्त्यावर चक्काजाम अंदोलन केले. यावेळी मागणीचे निवेदन तहसिलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले.
येथील पंचायत समिती कार्यालयासमोरून मोर्चाला सुरवात झाली. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाच, आरक्षण मिळालेच पाहीजे अशा आशयाच्या घोषणा देत मोर्चा बसस्थानक परिसरात आला. मोर्चा बसस्थानक आवारात सांगली – कोल्हापूर रस्त्यावर ठिय्या मांडून बसला. यावेळी दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक अशोक भवड यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वाहतूक सुरळीत झाली.
धनगर समाजाचा मतापूरता वापर राजकीय मंडळीनी केला आहे.परंतु धनगर समाज सुशिक्षीत झाला आहे. त्यामुळे हक्काच आरक्षण पदरात घेतल्याशिवाय राहणार नाही. संबधीत आरक्षणामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा धनगराची पोरं हातात कुऱ्हाडी, बंदूका घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे मत जिल्हाध्यक्ष शहाजी सिध्द यांनी व्यक्त केले.


previous post