Tarun Bharat

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चौघांवर गुन्हा

Advertisements

बंदी आदेशाचा भंग करून बानूरगड येथे बहिर्जी नाईक स्मारकाचे भूमिपूजन

प्रतिनिधी / विटा

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग करून खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम घेतल्या प्रकरणी भाजपचे राज्य प्रवक्ते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चार जणांवर विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नायब तहसिलदार चेतन रमेश कोनकर यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सोमवारी 19 जुलै रोजी सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा परिसर विकास व पर्यटन पायाभुत विकास कामाचे भुमिपुजन कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने केले होते. सदर कार्यक्रमाला बानूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे ठिकाणी अंदाजे 150 ते 170 लोक उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम जिल्हाधिकारी सांगली यांचे बंदी आदेशाचे उल्लंघन करुन घेतल्याचे नायब तहसिलदार चेतन रमेश कोनकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

यावरून बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर, निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे (भा)),भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर (दोघे रा. पडळकरवाडी, ता. आटपाडी) अशा चौघांवर विटा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जे. ए. जाधव करीत आहेत.

Related Stories

अर्थिक असमानता राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश

Sumit Tambekar

Coconut Oil Side Effects : ‘या’ समस्या असतील तर खोबरेल तेलापासून रहा दूर

Kalyani Amanagi

नागरिक मोठया संख्येने पडले घराबाहेर

Patil_p

एकादशीला विनापरवाना सोळा विठ्ठलभक्त पंढरीत दाखल

Abhijeet Shinde

भाजपजवळ बोलायला काही ठोस नसल्याने केवळ स्टंट सुरु; रोहित पवारांची भाजपवर टीका

Abhijeet Shinde

सांगली : जाडरबोबलाद लिंगायत स्मशान भुमीतील पत्र्याचे शेड गायब; चौकशीची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!