Tarun Bharat

आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून सीपीआरला 40 लाखांचा निधी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आमदार निधीतून 40 लाख रुपयांचा निधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाला (सीपीआर) दिला.

राज्य शासनाने खास बाब म्हणून आमदार निधीतून अर्थात स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदिसाठी खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी सीपीआरसाठी आमदार जाधव यांच्याकडे एनआयव्ही बीआय पॅप मशीन, मल्टी पॅरा मॉनिटर्स (5 पॅरा), व्हिडिओ लॅरिनोस्कोप, व्हेंटिलेटर सर्किट व बनीस सर्किट आदी वैद्यकिय यंत्रसामग्री व साहित्यासाठी 40 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली होती. या साहित्य खरेदीसाठी आमदार जाधव यांनी आमदार निधीतून 40 लाख 50 हजार रुपयांचा निधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआरला दिला.

Related Stories

हुतात्मा शंकरराव तोरस्कर यांचा 64 वा स्मृतीदिन 25 रोजी

Archana Banage

कोल्हापुरात चोरट्यांचा 34 लाखांवर डल्ला, ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयात चोरी

Archana Banage

सत्ताधारी नगरसेवकाकडून इचलकरंजी पालिका विद्युत विभागास टाळे

Archana Banage

दिवसातील फक्त दोन तास पक्षासाठी द्या ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Archana Banage

ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख केदार दिघे ३ डिसेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर

Archana Banage

कोल्हापूर : धास्ती वाढली, पंचगंगा धोका पातळीकडे

Archana Banage