Tarun Bharat

आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी घेतला शासकीय कार्यालयाचा ताबा.

       डिचोली/प्रतिनिधी

  डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी डिचोली शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारतीत असलेल्या शासकीय आमदार कार्यालयाचा काल शनि. दि. 2 एप्रिल रोजी विधीवतपणे ताबा घेतला. गुढीपाडव्यानिमित्त डॉ. शेटय़? यांनी सदर कार्यालयात देवकार्य करून विधीवतपणे प्रवेश केला.

  डिचोली शहरात आमदार भवन या नावाने आमदारासाठी विशेष शासकीय कार्यालय आहे. त्याजागी नंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची प्रशस्त इमारत झाल्यानंतर सदर कार्यालय या इमारतीत स्थलांतर करण्यात आले होते. या इमारतीच्या तळमजल्यावरच आमदारासाठी कार्यालय आहे.

   डॉ. चंद्रकांत शेटय़? हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सदर कार्यालयाचा ताबा माजी आमदार तथा माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी सोडला होता. त्यानंतर आमदार डॉ. शेटय़? यांनी सदर कार्यालयाची डागडुजी व रंगरंगोटी केल्यानंतर गुढीपाढव्याचा मुहूर्त धरून आत प्रवेश केला. आठवडय़ातीन दर बुधवार आणि शनिवारी डॉ. शेटय़? हे जनतेसाठी या कार्यालयात उपलब्ध राहतील. असे त्यांनी सांगितले.

   या कार्यालयातून लोकांना आवश्यक असलेल्या सर्व सरकारी योजनांची माहिती, अर्ज दिले जाणार. तसेच ते भरून सरकारकडे पाठविण्याचे कामही केले जाणार आहे. जेणेकरून लोकांना आपल्या कामांसाठी विविध कार्यालयांमध्ये पायपीट करावी लगू नये. कार्यालय दररोज खुले राहणार. या कार्यालयातून डिचोली मतदारसंघातील जनतेची सर्व कामे करून दिली जाणार आहे. गरीब कष्टाळू लोकांना आपल्या कामांसाठी त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. आता राजकारण संपले असल्याने मतदारसंघातील लोकांनी कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता या कार्यालयात येऊन आपली कामे करून घ्यावी, असे आवाहन आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी केले आहे.   

Related Stories

फोंडय़ात 19 रोजी राज्यस्तरिय शिमगोत्सव मिरवणूक

Amit Kulkarni

पणजीत झाली जणू ढगफुटीच

Amit Kulkarni

घरावर झाड कोसळल्याने रेवोडा येथे एक जखमी

Omkar B

स्वातंत्र्यदिनानिमित्त कुठ्ठाळीत मोटरसायकल रॅली

Amit Kulkarni

उदय पालयेकर यांचे निधन

Amit Kulkarni

न्यायदंडाधिकाऱयाला जाब विचारल्याप्रकरणी दांपत्याविरोधात गुन्हा नोंद

Amit Kulkarni