Tarun Bharat

आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

चळवळीतून बाजूला होऊन छातीवरील लाल बिल्ला काढून शेतकऱ्यांशी बेईमानी करणार्यांना संघटनेत थारा नसून आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिनानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. हिवरगाव जि. अमरावती येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
दरम्यान,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुरूवारी राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर टीकाही केली. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना पक्षातून काढताच काही वेळातच देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. “धन्यवाद’ अशा आशयाचा मजकूर देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट मध्ये केला आहे.

हिवरगाव येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, देवेंद्र भुयार यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जागा सोडवून घेण्यासाठी मी महाविकास आघाडी तोडण्याची भूमिका मांडली होती. त्यावेळी बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भुयार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. याच्याकडे काय बघून तुम्ही जागा सोडवून घेत आहात, असे स्वत: पवार बोलले होते. पण मी मात्र भुयार यांच्या जागेसाठी शेवटपर्यंत ठाम राहिलो. यांना आमदार करण्यासाठी खर्च सगळा मी उचलला. राज्यातील शेतकर्यांनी पैसे गोळा करून निधी दिला. तसेच पक्षाकडून वर्गणी गोळा करून ऑन रेकॉर्ड पक्षनिधी दिला. छपाई सर्व कार्यालयातून केली. एवढं सगळे करून देखील यांच्या छातीवरील लाल बिल्ला गायब झाला. निवडून आल्यावर १५ दिवसात भुयारांची भूमिका बदलली. स्वाभिमानीच्या कोणत्याही बैठकीला निरोप देऊन देखील हजर राहिले नाहीत. संघटनेच्या विरोधी भूमिका वेळोवेळी घेतली. चळवळीशी व शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्याला संघटनेत स्थान नाही. म्हणून मी यांची हकालपट्टी करत आहे. मोर्शीच्या जनतेची मी माफ मागतो. मी तुम्हाला चांगला माणूस दिला नाही. भुयार हे स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांनी त्वरीत आमदारकीचा राजीनामा देऊन स्वत:च्या जीवावर निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान दे़खील शेट्टी यांनी दिले. यावेळी प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, प्रविण मोहोड, दामोदर इंगोलेसह पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षातून हकालपट्टी करावी अशी कार्यकर्त्यांची मागणी
देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी होत होती. हिवरखेड येथे राजू शेट्टी यांची सभा होणार होती. त्यावेळी तिथे कार्यकर्त्यांनी देवेंद्र भुयार यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती. तसेच अनेक बॅनर पक्षातून हकालपट्टी करावी अशा आशयाचे होते. कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने राजू शेट्टी यांनी विचार करतो अशी त्यावेळी भूमिका घेतली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनात त्यांचा सहभाग नव्हता. सध्याच वीज बील, कर्जमाफी संदर्भात महाविकास आघाडी विरोधात आंदोलन सुरू केले असता आमदार भुयार कोणत्याही व्यासपीठावर न दिसल्याने त्यांची हकापट्टी करण्यात आली आहे.

Related Stories

कोरोनाचा कहर! महाराष्ट्रात 6.68 लाखांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण

Tousif Mujawar

पाच हजारपेक्षा जास्त पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा राष्ट्रीय विक्रम

Archana Banage

हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल

Archana Banage

अरुण गवळी 28 दिवसांच्या फरलोवर तुरुंगाबाहेर

datta jadhav

“मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी म्हणून करतात आणि त्या….”

Archana Banage

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

datta jadhav
error: Content is protected !!