प्रतिनिधी/ आटपाडी
महाविकास आघाडी सरकारने ७ मे २०२१ च्या निर्णयानुसार पदोन्नतील आरक्षण काढुन बहुजनांवर अन्याय केला आहे. मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा विचार न करता सरकारने सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचे निर्देश दिले आहेत. बहुजनांना आरक्षण मिळणार नाही, याची तजवीस सरकारने केल्याचा आरोप करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २५ मे पासुन मंत्रालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे दिलेल्या निवेदनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी पदोन्नतील आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र सोडले. बहुजन, मागासवर्गीयांच्या पदोन्नतील आरक्षण म्हणजे सापशिडी आणि बारामतीची जहागिरी आहे? असा सवालही आमदार पडळकर यांनी केला आहे.


previous post
next post