Tarun Bharat

आमदार पूर्णिमा श्रीनिवास यांना मंत्रिपद द्यावे

प्रतिनिधी/ चिकोडी

राज्यात यादव- हणबर समाजातील 60 लाखाहून अधिक नागरिक असून  समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्टय़ा मागासलेला आहे. यादव समाजाच्या चित्रदुर्ग जिह्यातील हिरियूर येथील एकमेव आमदार असलेल्या पूर्णिमा श्रीनिवास यांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी बेळगाव जिल्हा हणबर-यादव समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शीतल मुंडे यांनी केली. चिकोडी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आमदार पूर्णिमा श्रीनिवास या माजी मंत्री कृष्णाप्पा यांच्या कन्या असून गोल्लर समाजाच्या विकासासाठी त्यांनी अनेक जनहिताचे उपक्रम राबवून मागासलेल्या समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले आहेत. यांना वाडी-वस्त्यांना त्यांनी महूली गावांचा दर्जा मिळवून देवून त्यांनी आर्थिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी संधी दिली आहे. यादव समाजातील महिला आमदार असलेल्या पूर्णिमा श्रीनिवास यांना मंत्रिपद दिल्यास मागासलेल्या समाजाच्या विकासाला अधिक गती देता येणे शक्मय होणार आहे. मागासलेल्या समाजाला सर्वांगीण विकासासाठी सत्तेतील नेतृत्वाची शक्ती लाभणे आवश्यक असून पूर्णिमा यांनी आतापर्यंत केलेल्या लोकहिताच्या उपक्रमातून त्यांनी अनेकांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. समाज बळकट होण्यासाठी बोम्मई यांनी त्यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डी. आर. बाडकर, महादेव करोळी, बाबू मदिहळ्ळी, शिवाजी नाईक, आप्पासाहेब नाईक, मडिवाळप्पा बसर्गी उपस्थित होते.

Related Stories

मच्छे औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात होळी-रंगपंचमी पारंपरिकरीत्या साजरी

Amit Kulkarni

रॅम्बो सर्कस चे शानदार उद्घाटन

mithun mane

निपाणी तालुक्मयातील आणखी दोघे तडीपार

Omkar B

कांदा मार्केटमध्ये खोका उभारणीमुळे तणाव

Rohit Salunke

बेळगुंदी भागातील बससेवा सुरळीत करण्याची मागणी

Amit Kulkarni