Tarun Bharat

आमदार प्रणिती शिंदेंना मंत्रिपद नाही; सोलापुरात काँग्रेस नेते खर्गेंच्या पुतळ्याचे दहन

प्रतिनिधी / सोलापूर

आ. प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश न होण्यामागे केवळ आणि केवळ मल्लिकार्जून खर्गे यांचा हात आहे, असा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी  ‘खर्गे हटाव काँग्रेस बचाव’चा नारा देत खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

  सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे चार हुतात्मा पुतळा चौक येथे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात आ. प्रणिती शिंदे यांना स्थान मिळाले नाही. याला खर्गे जबाबदार आहेत. यामुळे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी, राहूल गांधी जिंदाबाद, काँग्रेस पक्षाचा विजय असो असे म्हणत खर्गे हटाव काँग्रेस बचाव अशा घोषणा दिल्या.

  यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश युवक सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सोमपा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, योगेश मार्गम, राजासाब शेख, संतोष अट्टेलूर, विवेक इंगळे, प्रवीण जाधव, राहुल गोयल, शाहू सलगर, यल्लप्पा तुपदोळकर, सुभाष वाघमारे, विवेक कन्ना, सैफन शेख, आप्पाजी गायकवाड, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

सोलापूर : करमाळा शहरासह तालुक्यात ४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Archana Banage

विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱया आरोपीला अटक

Patil_p

आदमापूर येथे होणारा संत बाळुमामा भंडारा उत्सव रद्द

Archana Banage

करमाळा शहरासह तालुक्यात ७० पॉझिटिव्ह

Archana Banage

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पाच जणांचे पथक पाचारण

Archana Banage

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात 151 रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage