Tarun Bharat

आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा शपथविधी संपन्न

प्रतिनिधी / वाकरे

पुणे विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातून विजय प्राप्त केलेले प्रा. जयंत आसगावकर यांचा विधानभवनात मंगळवारी शानदार समारंभात आमदार म्हणून शपथविधी संपन्न झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

आमदार प्रा.आसगावकर यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेताना आपण कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन अशी शपथ घेतली.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम,आमदार ऋतुराज पाटील,आमदार आसगावकर यांच्या पत्नी सौ.अनु आसगावकर, चिरंजीव अमेय आसगावकर व हितचिंतक उपस्थित होते.

मुंबई विधानभवनात आमदारकीची शपथ घेताना प्रा. जयंत आसगावकर, सोबत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब व इतर उपस्थित होते.

Related Stories

कोवाड ग्रामपंचायत सदस्याच्या साहसाने वाचले एकाचे प्राण

Archana Banage

Kolhapur : बहिरेवाडीत झाडाला गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

Abhijeet Khandekar

शिवसेनेच्यावतीने झालेला सत्कार पोलीस दलासाठी प्रेरणादायी – अप्पर पोलीस अधीक्षक काकडे

Archana Banage

World Heritage Week :दुर्मिळ शस्त्रभांडाराचे शस्त्रास्त्र दालन

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगाव येथे तात्काळ कोविड सेंटर सुरु करा : प्रविता सालपे

Archana Banage

आदेश काढायला ‘तो’ काय राष्ट्रपती आहे काय – नारायण राणे

Archana Banage