Tarun Bharat

आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचे उद्या कोल्हापुरात जल्लोष स्वागत

प्रतिनिधी / वाकरे

पुणे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे शनिवार दि.५ रोजी दुपारी ३ वाजता कावळा नाका, कोल्हापूर येथे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

प्रा.आसगावकर  यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ते शनिवारी कोल्हापूर येथे परत येत आहेत. कावळा नाका, कोल्हापूर येथे ताराराणी चौक येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीत अनेक दुचाकींची रॅली असणार आहे. ही मिरवणूक राजीव गांधी पुतळा, दसरा चौक शाहू महाराज पुतळा,बिंदू चौक, शिवाजी पुतळा, मार्गे मंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्य तारा कार्यालयासमोर विसर्जित होइल. यावेळी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्ष  महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या मिरवणुकीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नागरिक, हितचिंतक, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. सायंकाळी ५ वाजता सांगरुळ या त्यांच्या मूळ गावी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यातील ३०० आयसीयू आणि ४०० ऑक्सिजनेटेड बेडचा प्रस्ताव शासनाकडे

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत सात नव्या रुग्णवाहिका दाखल

Archana Banage

सात महिन्यांनी धावली हरिप्रिया..!

Archana Banage

विशाळगडावर ढोल ताशाच्या गजरात पार पडला नरसोबा मंदिर लोकार्पण सोहळा

Archana Banage

शिवीगाळ केल्याच्या रागातून पोकलॅंड ऑपरेटरचा खून

Abhijeet Khandekar

Kolhapur : मणेर मळ्यातील दोघे अल्पवयीन मुले सापडली

Abhijeet Khandekar