Tarun Bharat

आमदार बेनके यांच्याकडून सरकारी शाळांची पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी नुकतीच सरकारी शाळांची पाहणी करून येथील समस्या जाणून घेतल्या. त्यांनी शहरातील शाळा क्र. 3 ला भेट दिली. पुढील काळात शाळा सुरू झाल्यास त्यांना कशाप्रकारे सुविधा देण्यात येतील याविषयी चर्चा करण्यात आली. यासंदर्भात बोलताना आमदार बेनके म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक नियमावलीनुसार केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजना घेऊन सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असणार आहे. तसेच शाळांमध्ये वर्ग, शौचालये, बेंच, खिडक्मया-दरवाजे व क्रीडासाहित्य कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मतदारसंघातील सरकारी शाळांना अनुदान देण्यात येईल. कोणत्या शाळेत अडचण असल्यास त्यांनी आमदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Related Stories

जाचक कायद्यांविरोधात रक्त सांडण्यासही हटणार नाही!

Amit Kulkarni

नाईट कर्फ्यूमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत

Amit Kulkarni

शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण

Patil_p

उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस चरलिंगमठांचा सत्कार

Amit Kulkarni

मल्लापा काकतकर टीव्हीएस स्कूटीचे विजेते

Amit Kulkarni

आयुष्मान भारत योजनेंतर्गत 19 रुग्णालयात उपचार

Amit Kulkarni
error: Content is protected !!