Tarun Bharat

आमदार मिलिंद नाईक यांच्याविरूध्दचे काँग्रेसचे षडयंत्र फसले- मुरगाव भाजपा मंडळ

प्रतिनिधी /वास्को

मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात गुंतवून त्यांच्याविरूध्द निवडणुक जिंकण्याचे षडयंत्र काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी रचले होते. मात्र, त्यांचे षडयंत्र पूर्णपणे फसलेले असून मुरगावात भाजपा पुन्हा जिंकेल व राज्यात भाजपाचेच सरकार पुन्हा स्थापन होईल असा विश्वास मुरगाव भाजपा मंडळाने व्यक्त केला आहे.

यासंबंधी बुधवारी मुरगाव भाजपा मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत संकल्प आमोणकर यांनी खोटे आरोप करून निवडणुक लढवू नये. आपल्या कतृत्वाच्या बळावर निवडणुक लढवावी असे बजावले. मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्याविरूध्द काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी दाखल केलेली एका महिलेवरील कथीत लैगिंक अत्याचाराची तक्रार महिला पोलिसांनी चौकशीअंती फेटाळली आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करूनच महिला पोलिसांनी त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढलेला असून ते प्रकरण फसवे असल्याचे दिसून आल्यानेच पोलिसांनी तपास बंद केलेला आहे. या प्रकरणाची मुक्त आणि स्वच्छ वातावरणात चौकशी व्हावी यासाठीच आमदार मिलिंद नाईक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता चौकशी अंती तपास बंद झाल्यावर संकल्प आमोणकर यांनी राज्याच्या पोलिसांवरच संशय व्यक्त केला आहे. पोलिसांवर अविश्वास व्यक्त करणे चुकीचे असल्याचे मत यावेळी मुरगाव भाजपा मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी व्यक्त केले. आमोणकर चुकीचे आरोप करणे बंद करावे अशी सुचना त्यांनी केली.

मागच्या विधानसभा निवडणुक प्रचाराच्यावेळीही आमदार मिलिंद नाईक यांच्यावर विनयभंगाचे आरोप याच नेत्याकडून करण्यात आले होते. ते प्रकरणसुध्दा खोटेच निघाले होते. त्यानंतर या निवडणुकीवेळी पुन्हा नवी चाल खेळण्यात आली. तीसुध्दा फसलेली आहे. मुरगाव मतदारसंघात पुन्हा भाजपाच जिंकणार असून राज्यात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार आहे असा विश्वास यावेळी सातार्डेकर यांनी व्यक्त केला. मुरारी बांदेकर यांनीही यावेळी मागच्या निवडणुकीच्या वेळी आमदार मिलिंद नाईक यांच्याविरूध्द कशा प्रकारे खोटे आळ घालण्यात आले होते याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेवक लियो रॉड्रिक्स, प्रजय मयेकर, दामू नाईक, दयानंद नाईक, रामचंद्र कामत, मंजुषा पिळर्णकर, कुणाली मांद्रेकर, शशिकांत परब, संदीप मालवणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

आमदार कार्लुस आल्मेदा यांनी रेलमार्ग दुपदरीकरणासंबंधी सात वर्षांपूर्वी उपस्थित केले होते प्रश्न

Patil_p

मोफत पाण्यापेक्षा जुने दरच परवडणारे

Amit Kulkarni

दक्षिण व उत्तर गोव्यात काँग्रेसला विजयाची खात्री

Patil_p

यशवंत विद्यार्थी गावचे भूषण

Amit Kulkarni

गोवा विधानसभा : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Abhijeet Khandekar

सत्तरीत अनेक गावांत पाणी समस्या सुरूच

Amit Kulkarni