Tarun Bharat

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातर्फे दोन रुग्णवाहिका

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कोरोना काळात जनतेच्या सेवेसाठी दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी हा उपक्रम राबविला. निवडणूक जिंकले तोच दिवस आपला वाढदिवस समजतो असेही त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे लोकांना अत्यंत त्रास होत आहे. मला स्वतःलाही त्याचा अनुभव आला आहे. लवकरात लवकर हे संकट दूर होवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सदर रुग्णवाहिका सर्व समाजाच्या लोकांसाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दररोज बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन यासाठी लोक फोन करत असतात. त्यांचे दुःख मला समजू शकते. माझ्या परीने जितकी होईल तितकी मदत मी नक्की करेन, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

दोन हजारांहून अधिक बचत गट इंटेन्सिव्हमध्ये

Amit Kulkarni

कर्नाटकची पुराचा सामना करण्यासाठी केंद्राकडे ४ हजार कोटींची मागणी

Archana Banage

दीपक नार्वेकर 16 वर्षाखालील बीपीसी क्रिकेट स्पर्धा आजपासून

Patil_p

पशुसंगोपन सुरू करणार गो-शाळा

Amit Kulkarni

राम कॉलनी, आदर्शनगर रहिवासी संघटनेतर्फे वृक्षारोपण

Amit Kulkarni

ज्येष्ट नागरिकांना करता येणार घरबसल्या मतदान

Amit Kulkarni