Tarun Bharat

आमदार विजय सरदेसाई यांनी फातोर्डात सुरू केले ‘ई-कार्ट’

प्रतिनिधी /मडगाव

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी रविवारी फातोर्डात ई-कार्ट सुरू केले आणि ‘फातोर्डा मॉडेल’ सर्वांना पुढे घेऊन जाईल, असे सांगितले. ‘वुई फॉर फातोर्डा’ व उन्नती यांच्या सहकार्याने फातोर्डा येथे महिलांना सक्षम करण्यासाठी हे ई-कार्ट सुरू केले आहेत. यावेळी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, उषा सरदेसाई, गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षा आस्माबी, तियात्रिस्त प्रिन्स जेकब, निमिषा फालेरो आदींची उपस्थिती होती.

आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आम्ही आमचे क्षेत्र स्वच्छ ठेवण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. ई-कार्टच्या संकल्पनेमुळे महिला सक्षम व स्वावलंबी होतील. 1500 रुपयांची गृह आधार मदत कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाही. आपण अशा योजनांवर अवलंबून न राहता स्वावलंबी होण्यावर भर दिला पाहिजे, असे सरदेसाई म्हणाले.

महिलांना पुढे आणण्यासाठी ई-कार्टच्या या संकल्पनेवर सुमारे 30 लाख रु. खर्च करण्यात आले आहेत. ही संकल्पना येथे यशस्वी झाल्यावर आम्ही पुढे नेण्याचा निर्णय घेऊ. या संकल्पनेतून बचत गटांना उपजीविका मिळवून देण्याची संधी मिळेल. हा आमच्या फातोर्डा मॉडेलचा विस्तार आहे. आम्ही तो आणखी वाढवू, असे ते म्हणाले.

आस्माबी म्हणाल्या की, गोवा फॉरवर्डचा महिलांना सक्षम करण्याचा मानस आहे आणि म्हणूनच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रिन्स जेकब म्हणाले की, प्रत्येकाने काम करून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. विजय सरदेसाई यांनी तियात्र सुरू करण्यासाठी तियात्र क्षेत्राला मदत केली आहे, मात्र रवींद्र भवन नाटय़गृह उपलब्ध करून न देता अडथळे निर्माण करत आहे. थिएटर उपलब्ध करून दिले नाही, तर आम्ही तियात्राचा प्रयोग कसा आयोजित करू, असा प्रश्न त्यांनी केला. आमची रोजीरोटी हिरावून घेणाऱया या सरकारला धडा शिकवायला हवा, असे ते म्हणाले.

Related Stories

म्हादईसाठी तीव्र लढय़ाची तयारी

Patil_p

मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी खुल्या मैदानात यावे

Amit Kulkarni

डिचोली तालुक्यात कोसळधार सुरूच

Amit Kulkarni

कोरोनासंदर्भातील सरकारी निर्णयांत लोकांनी व्यत्यय आणू नये : काब्राल

Omkar B

आमदार अपात्रता प्रकरणाची एक याचिका ढवळीकरांकडून मागे

Amit Kulkarni

भाजप 22 हून अधिक जागा जिंकणार

Patil_p