Tarun Bharat

आमदार शिवेंद्रराजेंकडून लुंगीवरुन समाचार

प्रतिनिधी/ सातारा

खासदार उदयनराजे यांची स्टाईल हटके असते, त्यांचे डायलॉग हटके असतात. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईलवर चाहते फिदा असतात. त्यांनी रविवारी सायंकाळी उशीरा सेल्फी पाँईटवर जावून लुंगी नेसून डॉन्स केला. त्यांच्या डान्समुळे साताऱयातल्या अनेक तरुणांनी लुंग्या खरेदी केल्या. दरम्यान, शिवेंद्रराजेंनी पालिकेचे अपयश लपवण्यासाठी लुंगी डान्स केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. 

सातारचे खासदार उदयनराजे हे आपल्या चाहत्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी काय करतील याचा नेम नाही. नुकताच गाजत असलेला पुष्पा हा चित्रपट चक्क सिनेमागृहात जावून पाहणारे एकमेव खासदार असतील. त्यांनी त्यांच पुष्प चित्रपटातील लुंगीप्रमाणे स्वतः लुंगी नेसून रविवारी रात्री उशिरा पोवई नाक्यावरील सेल्फी पाँईटवर पुष्पाच्या गाण्यावर डान्स केला. त्यांच्या या डान्समुळे सातारा शहरासह राज्यातील अनेक तरुणांनी सोमवारी लुंग्या खरेदी केल्या आहेत. सातारा शहरात तर त्यांच्या या लुंगी डान्सची जोरदार चर्चा सुरु होती.

शिवेंद्रराजेंच्याकडून टीका

सातारा पालिकेची निवडणूक जवळ आली की लुंगी लावण्यासारखे काहीतरी ते करत आहेत. एकुणच नगरपालिकेच्या विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे नेण्याचा हा प्रकार आहे. गाणी लावून, लुंगी लावून फिरून गेल्या पाच वर्षाचे अपयश या लुंगीत लपविण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी सडेतोड टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंच्या लुंगी घालून धरलेल्या ठेक्यावर केली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा शहरात आम्ही काहीतरी काम या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून उभे केले आहे. त्या कामाच्या प्रेमात ते पडलेत, याचा आनंद आहे. प्रेमात पडेल असे एकही काम त्यांच्याकडे नाही. पण, गंमत अशी की राजकीय लोकांना फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लगात आहे. हा जरी गंमतीचा भाग असला तरी सातारा पालिकेची निवडणूक आली की लुंगी लावण्यासारखे काही तरी करत आहेत. आणखी किती पिक्चर येणार आहेत, याची मला माहिती नाही. पण, सातारा नगरपालिकेच्या विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे नेण्याचा हा प्रकार आहे. कुठं गाणी लावून फिर, कुठ लुंगी लावून फिर… गेल्या पाच वर्षाचे अपयश या लुंगीत लपविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे सातारकरांनी केवळ मनोरंजन म्हणून त्याकडे पहावे आणि हा विषय सोडून द्यावा. आगामी काही दिवसांत ज्यावेळी निवडणूका येतील. त्यावेळी अनेक डायलॉग, अनेक लुंगी लावून फिरणे असू देत, आणखी काही तरी सातारकरांना पहायला मिळणार आहेत. पालिकेतील त्यांचे नगरसेवक व नेत्यांना आता सातारकरांनी ओळखले आहे. आता उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीला घरी पोचविण्याचे काम सातारकर करतील, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केला.

Related Stories

…तर शाहरुखने आर्यनला पुनर्वसन केंद्रात ठेवावे

datta jadhav

सातारा : वराडे येथील अपघातात बेलवडे हवेलीतील तरुण ठार

Archana Banage

मुकेश अंबानी झाले आजोबा; आकाश-श्लोका यांना पुत्ररत्न

Tousif Mujawar

कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी शिंदे गटाबरोबर जाऊन मोठी चूक केली

Archana Banage

खटावचे जवान अजिंक्य राऊत यांचे निधन

Patil_p

पाटणमध्ये ‘मनमाड पॅटर्न’ला प्रारंभ

Patil_p