Tarun Bharat

आमिर खाननंतर आर. माधवनलाही कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


अभिनेता आमिर खाननंतर आता दक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेता म्हणजे आर. माधवन याला ही कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. 


माधवानने 2009 साली आलेल्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटाशी लिंक जोडत म्हणाला की, सर्व काही ठीक असून मी लवकरच या आजारातून बरा होईल.


आर. माधवानने 3 इडियट्स चित्रपटातील एक पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, ‘फरहान रॅन्चोला फॉलो करतो आणि व्हायरस नेहमीच त्यांना फॉलो करतो. यावेळी त्यांनी आम्हाला पकडले आहे. मात्र ऑल इज वेल आणि कोविडही लवकरच विहिरीत पडेल. या ठिकाणी राजुही यावा, अशी आमची अजिबात इच्छा नाही. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद, मी लवकरच बरा होईल. 


दरम्यान, आमिर आणि माधवनने 3 इडियट्स, रंग दे बसंती या चित्रपटात एकत्र काम केले आहे. अमीर खानच्या आधी कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, वरुण धवन आदी कलाकारांना कोरोनाची बाधा झाली होती. यातील काही जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

Related Stories

अभिनेता प्रवीण तरडे यांनी राजकीय पक्षाची भूमिका घेण्याबाबत ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

Kalyani Amanagi

सुशांत आत्महत्या : CBI कडून रिया चक्रवर्तीची 10 तास चौकशी

Tousif Mujawar

सागर घेतोय ऑनलाईन गिटारचे धडे

Patil_p

लूकवरून जान्हवी ट्रोल

Patil_p

रशियात प्रदर्शित होणार मराठी चित्रपट

Archana Banage

‘हीरोपंती-2’ ईदला होणार प्रदर्शित

Patil_p