Tarun Bharat

आमोणे येथील आश्रम शाळा, लोकोत्सवाचे आज उद्घाटन

Advertisements

प्रतिनिधी / काणकोण

बलराम शिक्षणसंस्थेचे स्वप्न असलेली आमोणे येथील आश्रम शाळा आणि आदर्श युवा संघाच्या 21 व्या लोकोत्सवाचे उद्घाटन आज 10 रोजी दुपारी 12 वा. आयोजित करण्यात आले असून उद्घाटन गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या समारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे सन्माननीय अतिथी, तर उपसभापती इजिदोर फर्नांडिस आणि यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या तुळशी गौडा खास निमंत्रित म्हणून या सोहळय़ाला उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन सोहळय़ाला प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी मंत्री  तसेच आदिवासी आयोगाचे अध्यक्ष रमेश तवडकर, आदिवासी कल्याण खात्याच्या संचालिका त्रिवेणी वेळीप, पैंगीणच्या जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप आणि पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर उपस्थित राहणार आहेत. कला आणि संस्कृती, लोकनृत्ये, समूह नृत्ये, पारंपरिक आहार, वनौषधींचे प्रदर्शन, कंदमुळांचे प्रदर्शन, विज्ञान, कृषी प्रदर्शन आणि देशी खेळ यांचा या तीन दिवसांच्या महोत्सवात समावेश असून 11 रोजी छात्तीसगडच्या राज्यपाल अनसुया उकेई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल सन्माननीय अतिथी, तर राज्यसभेचे खासदार आणि भाजपाच्या आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष समीर ओरावन, शिरोडाचे आमदार सुभाष शिरोडकर, ट्रीफडचे अध्यक्ष रामसिंह रठवा आणि एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर उपस्थित राहणार आहेत.

या तीन दिवसांच्या कार्यक्रमांत विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून 12 रोजी हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक सन्माननीय अतिथी, तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई खास अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने अशोक गावकर, श्रीकांत तवडकर यांनी दिली.

यंदाच्या लोकोत्सवात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंदाच्या साहाय्याने विविध राज्यांतील लोकनृत्यांचे सादरीकरण होणार आहे. लोकोत्सवाची तयारी पूर्ण झालेली असून दिवसाला 80 ते 100 कामगार आणि कार्यकर्ते विविध कामांत गुंतलेले दिसून आलेले आहेत. या ठिकाणी भरविण्यात येणाऱया प्रदर्शनांचे स्टॉल्स कायमस्वरूपी तयार करण्यात आले असून पक्क्या स्वरूपाचे आकर्षक असे प्रवेशद्वार उभारण्याबरोबर सर्वत्र रंगरगोटी करण्यात आलेला आहे. आदर्श युवा संघाचे कार्यकर्ते आपल्या घरातीलच कार्यक्रम असल्याप्रमाणे विविध कामांत गुंतले असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

Related Stories

फोंडा येथे शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे ख्रिसमस साजरा

Amit Kulkarni

आसगाव येथे 12 लाखांच्या चोरीप्रकरणी पश्चिम बंगालच्या चोरटय़ास अटक

Amit Kulkarni

‘बॅटल ऑन शिप’साठी विजेंदर-लॉप्सन पणजीत दाखल

Amit Kulkarni

सचिवालयातील कर्मचाऱयांचा कामावर बहिष्कार

Omkar B

टॅक्सीवाल्यांचा प्रश्न सरकार सोडविणार- मंत्री मायकल लोबो

Amit Kulkarni

वेळेत कामे होत नसल्यास बांधकाम खाते सोडायला तयार !

Amit Kulkarni
error: Content is protected !!