Tarun Bharat

आम्हाला तातडीने घरे मंजूर करा

Advertisements

साई प्रेंड्सचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

पावसामुळे घरे कोसळली आहेत. मात्र त्यांना अद्याप नुकसानभरपाई देण्यात आली नाही. तसेच पूर्वीपासूनच घर नसलेल्या अनेकांनी घर द्यावे, या मागणीसाठी महापालिकेकडे अनेकवेळा निवेदने दिली आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून आम्हा बेघरांना घरे मंजूर करावीत, अशी मागणी साई ग्रुप ऑफ प्रेड्सतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहरामध्ये अनेक ठिकाणी भाडोत्री घरामध्ये राहून आम्ही दिवस काढत आहे. कोरोना काळात आम्हाला भाडे देणे अशक्मय आहे. एक तर काम नाही. त्यातच कोरोनाचे संकट त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. तेंव्हा आम्हाला घरे मंजूर करावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण पाटील, गजानन पाटील, समीर बागवान, यल्लुताई पाटील, दयानंद पाटील, निंगाप्पा सिद्धनाळ, जयवंत शहापूरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Related Stories

मोदगा येथे दोन मंदिरात चोरी

Patil_p

शनिमंदिर कॉर्नरवर वाहतूक कोंडी

Patil_p

महसूल कर्मचाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni

येळ्ळूर विभाग म.ए.समिती कार्यालयाचे उद्घाटन

Patil_p

अतिवाडमध्ये ज्योतिर्लिंग मूर्तीची मिरवणूक उत्साहात

Amit Kulkarni

सीमावर्ती भागात दरोडेखोरांचा उच्छाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!