Tarun Bharat

आम्हाला तातडीने वेतन व भत्ता द्या

वसती शाळांमधील कंत्राटी कर्मचाऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

वसतीगृह व वसती शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कंत्राटीपध्दतीने काम करत आहे. मात्र लॉकडाऊननंतर आम्हाला वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून तातडीने वेतन व भत्ता द्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि वसतीशाळांमधील कंत्राटीपध्दतीने काम करणाऱया कर्मचाऱयांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन देवून ही मागणी करण्यात आली आहे. वसती शाळा तसेच वसतीगृहांमध्ये आम्ही कामे करत आहोत. कंत्राटीपध्दतीने काम करत असलो तरी आम्हाला वेतन वेळेत दिले जात नाही. तब्बल 8 महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. याबाबत महिला आणि बालकल्याण खात्याकडे तसेच मागासवर्गीय विभागाकडे विचारले असता थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत.

मात्र यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तेंव्हा तातडीने वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मुबारक सनदी, लखन कांची, बसवराज अमती, शिवाजी पवार, बजरंग कांबळे, कुमार अथणी, वनिता हेब्बाळ, श्रीकांत कांची यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

गटार बांधकामामुळे जलवाहिनी फुटल्याने नुकसान

Amit Kulkarni

एसीबीच्या छाप्याने बेळगावात खळबळ

Patil_p

हलगा ग्रा. पं. अध्यक्षपदी गणपत मारिहाळकर

Amit Kulkarni

शहरातील गर्दी ठरतेय चिंताजनकच

Amit Kulkarni

एकाच कुटुंबातील 3 मुलांना दुर्मीळ आनुवंशिक आजार

Amit Kulkarni

भात पिक पाण्याखाली …शेतकरी चिंतेत

Patil_p