Tarun Bharat

आम्हीही याच देशाचे, आमचीही स्वतंत्र जनगणना करा : पंकजा मुंडे

ऑनलाईन टीम

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसींची जनगणना व्हावी अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. स्व. गोपीनाथ मुंडेचा ओबीसी जनगणनेच्या मागणीचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही मागणी केली. “आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमचीही गणना करा. ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता आहे. कुछ यादे और कुछ वादे. असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.



पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेला स्व. गोपीनाथ मुंडे यांचा हा व्हिडिओ सन २०११ मधील संसदेतील भाषणातील आहे. या भाषणात मुंडे ओबीसींची जनगणना करण्याची मागणी करत आहेत. तर याबरोबरच दुसऱ्या ट्वीटमध्ये “2021 ची जनगणना जातीनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावातून उमटलेला आवाज हा राजधानीपर्यंत जरुर पोहचेल यात शंका नाही.” असे म्हटल आहे.



दरम्यान आजच जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नॉन क्रिमीलियरची अट रद्द करावी यासह इतरही अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.

Related Stories

संघर्षालाही मर्यादा असावी; पवारांनी दसरा मेळाव्यावरुन टोचले दोन्ही गटाचे कान

datta jadhav

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग व परीक्षा 15 फेब्रवारीपर्यंत ऑनलाईन : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Abhijeet Khandekar

“कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपच जबाबदार”

Abhijeet Khandekar

भारत सरकारकडून चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय

Tousif Mujawar

अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाची धुलाई..!

Rohit Salunke

उत्तर प्रदेश : 50 जिल्ह्यात 29 जुलैला होणार बीएड परीक्षा; 28 ऑगस्टला निकाल

Tousif Mujawar