Tarun Bharat

आम्हीही शंख वाजवला, आता सरकारचा घंटा वाजणार : राकेश टिकैत

Advertisements

नवी दिल्ली /प्रतिनिधी

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते आणि भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत सध्या उत्तर प्रदेशमध्ये आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारचा घंटा वाजणार असल्याचं विधान केलंय. तसेच हे वादळ आता पूर्वांचलकडे जाणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय. मागील १० महिन्यांपासून शेतकरी देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकायला तयार नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच भाजप ते हिंदुत्वाच्या नावावर निवडणुकीत तिकीट देणार आहेत. आम्ही घंटा वाजवला, शंखही वाजवला, आता या सरकारचा घंटा वाजणार आहे. हे वादळ आता इथून पूर्वांचलच्या दिशेने जाईल.” असे ते बडनगरमध्ये बोलताना म्हणाले.

राकेश टिकैत यांना पत्रकारांनी बडनगरला पुन्हा कधी येणार असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, “जेव्हा केव्हा इकडं कार्यक्रम ठरेल तेव्हा पुन्हा येईल. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. यावरुन जाण्याचा सर्वांना अधिकार आहे.”

बडनगरमधील घंट्याविषयी बोलताना टिकैत यांनी हा घंटा खराब झाला तर तो दुरुस्ती करण्याची जबाबदारी संघटनेची असेल. खराब झाल्यानंतर दुसरा घंटा लावत राहू. जोपर्यंत घंटा राहिल तोपर्यंत संघटना राहिल, टिकैत नाव राहिल. सरकार 10 महिन्यांपासून शेतकऱ्यांची मागणी ऐकत नाहीये. किमान घंट्याच्या निमित्ताने तरी ऐकेल अशी आशा आहे. ते हिंदुत्वाच्या नावावर निवडणुकीत तिकीट देणार आहेत. आम्ही घंटा वाजवला, शंखही वाजवला, आता या सरकारचा घंटा वाजणार आहे. हे वादळ आता इथून पूर्वांचलच्या दिशेने जाईल.

Related Stories

दिवाळीआधीच ‘दिवाळी’

Omkar B

अंदमानात मान्सूनची चाहूल

datta jadhav

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही – मुख्यमंत्री

Archana Banage

‘नंदीग्राम’प्रकरणी सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर

Amit Kulkarni

बैठकीस कोणीच हजर नाही असे म्हणणे चुकीचे : खा. धैर्यशिल माने

Abhijeet Khandekar

नरेंद्र मोदी सरकारवर बरसले राहुल गांधी

Patil_p
error: Content is protected !!