Tarun Bharat

“आम्ही गोडसेच्या भारताशी हातमिळवणी केली नाही तर…;” मेहबुबा मुफ्तींचं विधान

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti Former Chief minister of J&K) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या युक्त्यांमुळे जम्मूची लोकं काश्मीरपासून (kashmir) दूर जात आहेत, असा आरोप मुफ्ती यांनी केला आहे. तसेच त्यांनी जम्मूच्या जनतेला काश्मीरशी मजबूत संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे. माजी मुख्यमंत्री मुफ्ती यांनी ऑगस्ट २०१९ च्या पूर्वीप्रमाणे जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने त्यांचा संघर्ष सुरूच राहील, असे त्या म्हणाल्या.

मुफ्ती यांनी “आज काश्‍मीर दुःखात आहे. झालेली जखम आणखीनच वाढत चालली आहे आणि काश्मीर आपल्यापासून दूर जात आहे,” असे वकिलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या. भाजपाचे नाव न घेता, त्या म्हणाल्या की “जे लोक कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्व काही ठीक झाले आहे, असे म्हणत आहेत ते खोटे दावे करत आहेत. कारण जम्मू-काश्मीरमध्ये वास्तविक परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.”

सेच नथुराम गोडसे “काश्मिरी एका रात्रीत बदलले नाहीत. हे तेच लोक होते ज्यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानपेक्षा लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष भारताला प्राधान्य दिले. आम्ही महात्मा गांधींच्या भारताशी हातमिळवणी केली, त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या भारताशी नाही. काही शक्ती गांधींच्या भारताला गोडसेचा भारत करण्याच्या प्रयत्न करत आहेत. पण आम्ही ते होऊ देणार नाही आणि देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा विरोध करू,” असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

Related Stories

गुजरात निवडणुकीनंतर राज्यपालांची उचलबांगडी?

datta jadhav

केरळमध्ये आढळला ‘झिका’ विषाणूचा पहिला रुग्ण

Rohan_P

राजस्थान काँगेसमध्ये गटबाजी सुरूच

Patil_p

सोळांकूरात थेट पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी रोखले

Sumit Tambekar

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 7717 नवे कोरोना रुग्ण; तर 282 मृत्यू

Rohan_P

दोनशे पाच वर्षांची परंपरा असणारी चांदे दिंडी पंढरपूरला रवाना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!