Tarun Bharat

आम्ही छत्रपती शिवरायांचे वारस, विसरू नका !

Advertisements

करवीरवासियांचा कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा

प्रतिनिधी / कोल्हापूर

संयुक्त महाराष्ट्रसाठीचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीचार्ज, गोळीबार करुन दमलेले कर्नाटक सरकार आता आंदोलकांना गुंडाकडून धमकावत आहे. पण या गुंडांनी आम्ही राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचे वारसदार आहोत, याची जाणिव ठेवावी. आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न कराल तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांसह करवीरवासियांनी दिला. कर्नाटक सरकारची दडपशाही यापुढे यापुढे खपवून घेतली जाणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सर्व मराठी सीमाभाग त्वरीत केंद्रशासीत करावा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शनिवारी दसरा चौक येथे एक दिवशीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनास कोल्हापूर जिह्यातील विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यानी पाठींबा देऊन कर्नाटक सरकारच्या अन्यायाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. सर्व सीमा भाग त्वरीत केंद्रशासीत करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या लढ्यामध्ये करवीरवासिय नेहमीच सहभागी असतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

आंदोलन सुरु झाल्यापासून ते समारोपापर्यंत अनेक करवीरवासिय दसरा चौकात स्वतःहून येत होते. संयुक्त महाराष्ट्र व्हावा, अशी पोटतिडीक आहे. म्हणून आंदोलनात आलो आहे, असे बऱयाच आंदोलकांनी बोलून दाखवले. भविष्यातही ज्या ज्यावेळी आंदोलन पुकारले जाईल, त्या त्यावेळी आम्ही धावून येऊ असा विश्वासही करवीरवासियांनी दिला.

   आंदोलनाला मुस्लिम बोर्डींगचे मोठे सहकार्य...

महाराष्ट्र एकीकरण समितीचे आंदोलक आंदोलनासाठी दसरा चौकात येणार हे कळल्यानंतर मुस्लिम बोर्डींगच्या पदाधिकाऱयांनी बोर्डींगची दारे आंदोलकांसाठी खुली केली. शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आंदोलक बेळगाव, बेळगाव ग्रामिण आणि खानापूरातील आंदोलक दसरा चौकात येऊ लागले होते. या सर्वांचे मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे प्रशासक कादर मलबारी आणि अश्पाक आजरेकर यांनी आंदोलकांचे स्वागत केले. बोर्डींगच्या आवारात नेऊन आंदोलकांची आपुलकीने विचारपूस केली. वयस्करासाठी बसण्याची सोयही केली. शिवाय आंदोलन सुरु झाल्यापासून ते अगदी समारोपापर्यंत आंदोलकांना काय हवं-नको याचीही काळजी घेतली.

        यांनी दिले आंदोलनाला बळ 

माजी नगरसेवक जय पटकारे, काँगेसचे जिल्हा सचिव संजय वाईक, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे उपाध्यक्ष नारायण लोहार, माजी नगरसेवक अनिल कदम, जुना बलभीम बँकेचे माजी संचालक रामदास भाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जगताप, संजय कुऱहाडे, रियाज कागदी, बी. के. भास्कर, निरंजन कदम, लहुजी शिंदे, सोहेल बागवान, जवाहर भोसले, शांतीजीत कदम, मगबुल नायकवडी, जैश शेख, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती : संस्थापक किसन कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी, उपाध्यक्ष डॉ. गुरुदत्त म्हाडगुतकर, संग्रामसिंह जाधव, अनिल चव्हाण, प्रविण मोहिते, मुसा शेख, लक्ष्मण मोहिते, विजय जाधव, सुमीत खानविलकर, नयन यादव, प्रशांत बरगे, सतिश पोवार, अमर खाडे, आम आदमी पार्टी : युवा अध्यक्ष उत्तम पाटील, सुरज सुर्वे, मोईन मोकाशी, संतोष घाटगे, प्रथमेश सूर्यवंशी, मयुर भोसले, बसवराज हदीमनी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना : विजय करजगार, रत्नदीप चोपडे, महावीर बीटके, संजय करजगार, संजय घाटगे, दीपक पाटील, सचिन घोडके. छावा संघटना : राजू सावंत, पपू सूर्यवंशी, प्रकाश पाटील, उमेश देवकर, योगेश पोवार. कोल्हापूर जिल्हा मुख आणि कर्णबधीर संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल पार्टे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव शेळके, वशू असोसिएशन ऑफ डिस्ट्रीक्ट : उपाध्यक्ष सतिश वडणगेकर, सचिव अविनाश पाटील, मोहन ढवळे, सुजित हतकर, लखन सावंत, मजीद शेख, सतिश मदळे, रोहित काशीद, अथर्व पाटील, सौरभ पाटील.

Related Stories

कोल्हापुरकरांचा विकेंड लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशी ही प्रतिसाद

Abhijeet Shinde

मराठी भाषेतही फलक बसवा

Amit Kulkarni

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेची बैठक उत्साहात

Amit Kulkarni

महामार्गावर बंदोबस्त,वाहनांची तपासणी

Omkar B

एकनाथ शिंदेंच्या गोटातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क; संजय राऊतांचा दावा

Abhijeet Shinde

हलगा-मच्छे बायपासची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!