Tarun Bharat

आयआयटी मद्रासकडून स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम

कंपन्यांना मनमानीला बसणार आळा ः युजर्सच्या खासगीत्वाचे होणार रक्षण

वृत्तसंस्था  / चेन्नई

भारतात वापरल्या जाणाऱया सर्व मोबाइल्समध्ये ऍपल किंवा गुगल ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. भारतातील सर्व स्मार्टफोन गुगल आणि ऍपल ऑपरेटिंग सिस्टीमने संचालित होत असतात. याचमुळे या दोन्ही कंपन्या मोबाइल मार्केटवर राज्य करत असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परंतु गुगल आणि ऍपलच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी भारत आता स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम सादर करणार आहे. याचे नाव ‘बीएचएआरओएस’ आहे. या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीमला आयआयटी मद्रासने विकसित केले आहे. भारताला याप्रकरणी यश मिळाल्याने ऍपल आणि गुगलच्या चिंता वाढू शकतात.

बीएचएआरओएसमुळे सुमारे 100 कोटी मोबाइल युजर्सना लाभ होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच हे ऑपरेटिंग सॉफ्टवेअर अन्य ओएसच्या तुलनेत खूपच सुरक्षित असणार आहे. बीचएआरओएस युजर्सना आवश्यक ऍप इन्स्टॉल करण्याची अनुमती देते. सध्या गुगल आणि आयओएस सॉफ्टवेअरमध्ये जीमेल, क्रोम, युटय़ूब यासारखी ऍप्स डिफॉल्ट स्वरुपात उपलब्ध असतात, या ऍप्सना युजर्स इच्छा असूनही हटवू शकत नाही. तर बीएचएआरओएसमध्ये या ऍप्सना हटविता येणार असल्याने मोबाइल ऍपसाठीची स्पेस योग्य ठिकाणी वापरता येणार आहे.

बीएचएआरओएसकडून युजर्सना वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध करविले जाऊ शकते. सध्या अन्य ओएसकरता युजर्सना प्रतीक्षा करावी लागते. बीएचएआरओएस सादर झाल्यावर स्मार्टफोनच्या किमतीत घट होऊ शकते. कारण सध्या स्मार्टफोन युजर्सना ओएससाठी गुगलवर निर्भर रहावे लागते. अशा स्थितीत गुगलकडून मनमानी शुल्क आकारले जाते. ऍप डेव्हलपर्सना देखील स्वदेशी ओएसमुळे मोठा दिलासा मिळू शकतो. या ऍप बिलिंगवर लागणाऱया करात कपात केली जाऊ शकते.

सध्या ही ऑपरेटिंग सिस्टीम सर्वांसाठी उपलब्ध नाही. सर्वांकरता ही ओएस उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आयआयटी मद्रास आता दूरसंचार कंपन्या, शासकीय यंत्रणा आणि खासगी उद्योगाशी चर्चा करत आहे. स्वदेशी ओएस युजर्सना अधिक स्वातंत्र्य, नियंत्रण देत असल्याचे आयआयटी मद्रासने सांगितले आहे.

Related Stories

मुंद्रा बंदरावर 350 कोटींचे हेरॉइन जप्त

Patil_p

वादग्रस्त दृश्यप्रकरणी कपिल शर्मावर गुन्हा

Patil_p

पत्रकार रोहित सरदाना यांचे हार्ट ऍटॅकने निधन

Patil_p

चीनच्या सैन्याकडून पुन्हा घुसखोरी

Patil_p

उंदराला बुडवून मारल्यामुळे कारावास

Patil_p

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर चर्चा, पंतप्रधानांकडून सकारात्मक निर्णयाची आशा : मुख्यमंत्री

Archana Banage
error: Content is protected !!