Tarun Bharat

आयआरसीटीसीचे समभाग 9 टक्क्यांनी वधारले

समभाग वधारुन 3,297 रुपयावर पोहोचला – अनेक कंपन्या आपल्या कामगिरीत सुधारणा करतानाचे चित्र

वृत्तसंस्था/ मुंबई

रेल्वेची कंपनी इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) चे समभाग मंगळवारच्या सत्रात 9 टक्क्यांनी वधारुन 3,297 रुपयावर पोहोचले आहेत. या कारणामुळे कंपनी बाजारमूल्यात जवळपास 89 व्या स्थानी राहिली आहे. यासोबत बाजारमूल्य 52,610 कोटी रुपयावर पोहोचले आहे.

मागील चार दिवसांमध्ये कंपनीचे समभाग हे जवळपास 21 टक्क्यांनी वधारले आहेत. मागील चार दिवसांत सलगपणे समभाग वाढत राहिले आहेत. यामध्ये सोमवारी ही वाढ पाच टक्क्यांनी वाढली होती. एक आठवडय़ाच्या अगोदर हे समभाग 2,711 रुपये होते.

बाजारमूल्य 52,610 कोटीवर

सोमवारी आयआरसीटीसीचे बाजारमूल्य 48,100 कोटीवर होते, हाच आकडा मंगळवारी 52 हजार रुपयावर पोहोचला होता. यामध्ये समभाग 4.88 टक्क्यांनी वधारुन 3,009 रुपयावर बंद झाला होता. मागील 1 महिन्यात कंपनीचे समभाग 2,450 नी वधारुन 3,041 वर पोहोचले आहेत.

मॅक्रोटेकला टाकले मागे

आयआरसीटीसीने मॅक्रोटेकला पाठीमागे टाकले आहे. सोमवारी मॅक्रोटेक आयआरसीटीसीच्या पुढे होते. समभागांच्या किमतीमधील तेजीमुळे अनेक कंपन्या चालू वर्षात आपले रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

बजाज ऑटोची तिमाहीत मजबूत कामगिरी

Amit Kulkarni

आयआरबीला मिळाले 2 प्रकल्प

Amit Kulkarni

आनंद राठी वेल्थ यांची 193 कोटींची उभारणी

Amit Kulkarni

डाटा केंद्र विकसित करण्यासाठी अदानी राबविणार संयुक्त उपक्रम

Patil_p

बँकिंग-आयटीसह धातू क्षेत्राने बाजार सावरला

Amit Kulkarni

वनप्लस8-8प्रो स्मार्टफोन्स सादर

Patil_p