Tarun Bharat

‘आयएनएस चेन्नई’वरून ‘ब्रह्मोस’चा यशस्वी मारा

भारतीय नौदलाच्या ताकदीत वाढ होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय नौदलाने शनिवारी स्टेल्थ डिस्ट्रॉयर ‘आयएनएस चेन्नई’वरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या हल्ला करण्याच्या अचूकतेची यशस्वी चाचणी पार पाडली. भारतीय नौदलाकडून या प्रात्यक्षिकाची माहिती देण्यात आली. हे प्रात्यक्षिक भारतीय नौदलाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. याद्वारे समुद्रात खोलवर मारा करण्याची क्षमता आणि समुद्रापासून दूर असलेल्या जमिनीवरील मोहिमेतील लक्ष्य भेदण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे आता भारतीय नौदलाच्या ताकदीत मोठी वाढ होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी  ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या लँड ऍटॅकची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी अंदमान आणि निकोबार बेट समूहाजवळ पार पडली होती. सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र 21 व्या शतकातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असून ते ताशी 4,300 किमी वेगाने शत्रूचे स्थान नष्ट करू शकते. ते 400 किमी अंतरापर्यंत शत्रूला लक्ष्य करू शकते. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शत्रूराष्ट्रांच्यादृष्टीने हे सर्वाधिक घातक क्षेपणास्त्र ठरू शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या यापूर्वीही बऱयाच चाचण्या घेतल्या असून त्या पूर्णपणे यशस्वी ठरलेल्या आहेत. मागील महिन्यातच आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेवरूनही ब्रह्मोसची चाचणी यशस्वी ठरली होती. 

भारताच्या ‘आत्मनिर्भर’ योगदानाला बळकटी

ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि आयएनएस चेन्नई या दोन्ही प्रणाली स्वदेशी बनावटीच्या आहेत. साहजिकच या यशस्वी चाचणीनंतर भारतीय क्षेपणास्त्र आणि जहाज बांधणीतील आपली सक्षमता आणि पराक्रमाच्या अत्याधुनिकतेचे एक मोठे उदाहरण ठरले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ प्रयत्नांमध्ये भारतीय नौदलाच्या योगदानाला बळकटी मिळत आहे.

Related Stories

‘जमात’च्या कार्यक्रमात सहभागी झालेले बिदरमधील 11 जण कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

उत्तरप्रदेशसाठी काँग्रेसचे 125 उमेदवार घोषित

Amit Kulkarni

शेतकऱयाने बनविली रेसिंग कार

Patil_p

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

‘या’ राज्यांत आजपासून शाळा सुरू

Tousif Mujawar

इन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 11 टक्के नफा

Patil_p