Tarun Bharat

आयएमए घोटाळा प्रकरणात रोशन बेग यांना जामीन मंजूर

बेंगळूर/प्रतिनिधी

आयएमए पोंझी घोटाळ्याप्रकरणी हजारो गुंतवणूकदारांचे पैसे गमावल्याप्रकरणी माजी मंत्री रोशन बेग अटकेत आहेत. दरम्यान आयएमए घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री बेग यांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

दरम्यान बेग यांना ह्रदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने गुरुवारी २६ रोजी बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २८ नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्यात आलेल्या रोशन बेग यांना परप्पन अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. ते आजारी असल्याने तुरुंगातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते आणि नंतर तब्बेत खालावल्यानंतर डॉक्टरांनी जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोव्हॅस्कुलर सायन्स येथे कार्डियोलॉजिस्टचे वैद्यकीय मत घेऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले होते. आता मंत्री बेग यांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने जामीन मंजूर केल्याने त्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

Related Stories

कर्नाटकः मुख्यमंत्री बोम्माई आज पंतप्रधान मोदींना भेटणार

Archana Banage

आरोग्य सेतू ऍप नसणाऱयांना सुविधा नाकारू नये

Patil_p

राज्यात नववी ते बारावीच्या वर्गांना प्रारंभ

Amit Kulkarni

पोलीस शाळा पुनरुज्जीवित करणार: गृहमंत्री

Archana Banage

अलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Archana Banage

कर्नाटक: मंत्री एस.टी. सोमशेकर कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage