Tarun Bharat

आयओसी अध्यक्ष बाक यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे आभार

वृत्तसंस्था/ लॉसेन

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकला दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या वर्षी होणारी ही स्पर्धा कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आता एका वर्षासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

Advertisements

1 एप्रिल रोजी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात बाक यांनी, अलीकडेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या जी 20 शिखर परिषदेत भारतीय पंतप्रधानांनी टोकियो ऑलिम्पिकला भरघोस पाठिंबा दिल्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘टोकियो ऑलिम्पिकला तुम्ही मोठे समर्थन दिलेत त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे, त्याचा स्वीकार करावा. जी 20 शिखर परिषदेतील भाषणात तुम्ही कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती करीत असलेल्या कार्याचाही तुम्ही गौरव केलात. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे,’ अशा भावना बाक यांनी पत्रात व्यक्त केल्या
आहेत.

Related Stories

सत्यवर्त, सुमित उपांत्यपूर्व फेरीत, धनकर पराभूत

Amit Kulkarni

हैदराबादमध्ये प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धा

Patil_p

सॅलिव्हा वापरावर ऑस्ट्रेलियाकडून बंदी

Patil_p

झिंबाब्वेच्या कायाच्या गोलंदाजीवर आक्षेप

Patil_p

दानिश फारूकचा बेंगळूर एफसीशी करार

Patil_p

‘पृथ्वी’ने गाठले विजयाचे ‘शिखर’

Amit Kulkarni
error: Content is protected !!