Tarun Bharat

आयजीएममध्ये लवकरच बसणार सिटीसस्कॅन मशिन

हातकणंगले, शिरोळसह इचलकरंजीतील रूग्णांना लाभ
आयसीयू पुर्ण क्षमतेने कार्यरत

इराण्णा सिंहासने / इचलकंरजी

येथील आयजीएम रूग्णालयात लवकरच सिटीस्कॅन माशिनची उपलब्धता होणार असून याचा फायदा शिरोळ, हातकणंगलेसह इचलकरंजी शहरातील रूग्णांना होणार आहे.

रूग्णालयात यापुर्वीच आयसीयु, ऑक्सिजन टाकी यासह पुर्ण क्षमतेने बाह्य रूग्ण विभाग सुरू आहे. येथील आयजीएम हॉस्पिटलचे शासनाकडे हस्तांतर झाल्यानंतर याचे रूपांतर इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात झाले. पण येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोजकी संख्या, आरोग्य विषयक सुविधांची वाणवा यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा कोणताही लाभ होत नव्हता. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोना संसर्गात आयजीएम कोविड हॉस्पिटल म्हणून जाहिर झाल्यानंतर येथे अनेक सुविधा शासनाकडून पुरवण्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, २० खाटांचे आयसीयू युनिट, ६ हजार लिटरचा ऑक्सिजन टँक यासह अनेक आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यात आल्या. यामुळे ७ महिन्यांमध्ये या रूग्णालयात ३ हजारापेक्षा जास्त कोरोना रूग्णांवर यशस्वी उपचार करणे शक्य झाले.

सध्या कोरोनाची लाट ओसल्यामुळे रूग्णांची संख्या खुपच कमी झाली आहे. या अनुषंगाने रूग्णालयात बाह्यरूग्ण विभाग सुरु करण्यात आला असून येथे दररोज सुमारे २५० रूग्ण तपासणीसाठी येत आहेत. यापुर्वी रूग्णालयातआयसीयू विभाग नसल्याने गंभीर रूग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर अथवा सांगली सिव्हील येथे पाठवावे लागत होते. पण कोरोना काळातच रूग्णालयात आयसीयूचे २० बेड उपलब्ध झाले असुन ६ बेड व्हेंटिलेटरसाठी राखीव आहेत. याचा फायदा भाविष्यात नॉन कोविड रूग्णांना होणार आहे. या कालावधीतच रूग्णालय आवारात ६ हजार लिटरचा ऑक्सिजन टॅंक बसवण्यात आला आहे. त्यामुळे २०० रुग्णांना एकाचवेळी ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे.

अनेक वर्षापासून प्रलंबित आयजीएम इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी झाली असून येथे दैनंदिन सफाई होत असल्याने स्वच्छता दिसून येत आहे. या ठिकाणी सध्या येथे प्रसुती विभाग, स्त्रीरोग, आर्थोपेडीक, दंतरोग, एचआरटीसी यासह अनेक विभाग पुर्ण क्षमतेने सुरु आहेत. आता रूग्णांसाठी लवकरच सिटीस्कॅन मशिनची सोय होणार असल्याने रूग्णांची गैरसोय तर थांबणारच आहे, पण बाहेरील सेंटरवर सिटीस्कॅनसाठी होणारा खर्चही वाचणार आहे.

आयजीएम अद्यापही या सुविधांच्या प्रतिक्षेत

आयजीएम रूग्णालयात कोरोना आपत्तीमुळे अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी अजूनही काही सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. यामध्ये एमआरआय मशीन, डायलिसीस विभाग, बर्निंग वॉर्ड, रक्तपेढी यासह काही विभागांचा समावेश आहे. या ठिकाणी असलेली एक्स-रे मशिन ही १९८८ सालची असल्याने जुनाट झाली आहेत. परिणामी रूग्णांना याचा पुरेसा व अचूक लाभ होत नसल्याही ही
मशीन बदलण्याची मागणी होत आहे. तसेच येथे अजूनही काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे.

आणखी १०० बेडची मागणी

आयजीएम रूग्णालयाची क्षमता ही ३०० बेडची आहे. सध्या या ठिकाणी २०० बेड उपलब्ध आहेत. या हॉस्पिटलवर शिरोळ, हातकणंगले तालुक्यासह ४ लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी शहराच्या आरोग्यसेवेचा भार असल्याने येथे आणखी १००
बेडला मान्यता मिळावी, यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

गुंतवणुकदारांची ४२ लाखांची फसवणूक

Archana Banage

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Archana Banage

नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची 6 लाखांची फसवणूक

Archana Banage

राज्यातील सहाही विधानपरिषद जागा भाजप जिंकणार

Abhijeet Khandekar

डोससाठी ऑनलाईन नोंदणीचा घोळ

Archana Banage

कोल्हापूरकरांना दिलासा, दिवसभरात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही

Archana Banage