Tarun Bharat

आयटीबीपीच्या आणखी 7 जवानांना कोरोना

शनिवारी प्राध्यापकाचा अहवाल पॉझिटिव्ह, 1140 विद्यार्थ्यांचे स्वॅब जमविले

प्रतिनिधी / बेळगाव

हलभांवी येथील आयटीबीपी (इंडो टिबेटीयन बॉर्डर फोर्स) मधील आणखी 7 जवानांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी 7 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरुन उघडकीस आले होते. दोन दिवसांत एकूण 14 जवानांना कोरोनाची लागण झाली असून आणखी एका प्राध्यापकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

बेळगाव शहर व उपनगरांतील 2 हजार 321 प्राध्यापक व शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱयाचे स्वॅब जमविण्यात आले आहे. आतापर्यंत 327 अहवाल उपलब्ध झाले असून यामध्ये 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित 320 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्राध्यापक, कर्मचाऱयांपाठोपाठ आता विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी सुरू करण्यात आली आहे.

तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिवसभरात आरोग्य विभागाने 1140 विद्यार्थ्यांचे स्वॅब जमविले असून त्या तपासणीसाठी लॅबला पाठविण्यात आले आहेत. वेगवेगळय़ा महाविद्यालयात 3 हजार 500 हून अधिक विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी होणार आहे.

शनिवारी जिह्यातील 32 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण बाधितांची संख्या 25 हजार 425 वर पोहोचली आहे. 24 हजार 703 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 282 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. बेनकनहळ्ळी, शिंदोळी, गोकुळनगर-के.के.कोप्प, कंग्राळी बी.के., नंदिहळ्ळी, भेंडीगेरी, बसवाण गल्ली-बेळगाव, भाग्यनगर, हनुमाननगर, जाधवनगर, रामतीर्थनगर, वैभवनगर, वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी शहरातील सहा प्राध्यापकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शनिवारी आणखी एका प्राध्यापकला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित अहवाल अद्याप उपलब्ध झाले नाहीत. प्रशासनाला आणखी 2 हजार 69 अहवालांची प्रतिक्षा आहे. तर 28 हजार 346 जण अद्याप 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.

बेळगावात कोरोना आटोक्यात

बेळगाव शहर व जिह्यात कोरोना महामारीचा फैलाव आटोक्मयात आला आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शनिवारी दिली. सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात विविध विकास कामांच्या उद्घाटनानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. सुरूवातीला बेळगाव जिह्यात कोरोनाचा फैलाव अधिक होता. अधिकारी, लोकप्रतिनिधी व बेळगावकरांच्या सहकार्याने फैलाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. एकूण बाधितांपैकी 97 टक्के जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूचे प्रमाणही गेल्या 15 दिवसांत 0.8 टक्के वर आले आहे, असे सांगत डॉ. सुधाकर यांनी जिल्हाधिकाऱयांचे अभिनंदन केले.

Related Stories

रेल्वे स्थानकाचा चेहरा आता बदलणार

mithun mane

ग्रा.पं.मधील कर्मचाऱ्यांनाच बढती मिळावी

Amit Kulkarni

अन्नत्थेने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीला टाकले मागे

Abhijeet Khandekar

कॅन्टोन्मेंट परिसरात जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

शिवाराला आले तलावाचे स्वरुप

Patil_p

तालुका म.ए.समितीची उद्या बैठक

Patil_p