Tarun Bharat

आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून

मुंबईत होणाऱया पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सहभाग  

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

2020 मध्ये होणाऱया आयपीएलची सुरुवात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 29 मार्च रोजी होणार आहे. यजमान मुंबई इंडियन्स या मोसमातील मोहिमेला या सामन्याने सुरुवात करणार आहे.

स्पर्धेची सुरुवात 29 मार्चला होणार हे निश्चित असून मुंबई इंडियन्स हा समना खेळणार आहे, असे दिल्ली कॅपिटल्सच्या पदाधिकाऱयाने सांगितले. यासंदर्भात त्यांना सांगण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. या तारखेला आयपीएलची सुरुवात झाली तर पहिल्या दोन सामन्यात सहभागी संघांना त्यांच्यात संघात असलेल्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंडच्या खेळाडूंशिवाय खेळावे लागेल. कारण याच दरम्यान दोन आंतरराष्ट्रीय मालिका होत असल्याने ते खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेचा शेवटचा सामना 29 मार्च होणार आहे तर इंग्लंड व लंका यांच्यातील कसोटी मालिका 31 मार्चला संपणार आहे.

या संदर्भात बोलताना हा पदाधिकारी म्हणाला की, ‘29 मार्चला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे तर इंग्लंड-लंका यांच्यातील दुसरी कसोटी 31 मार्चला संपणार आहे. अशा स्थितीत आयपीएलची सुरुवात या विदेशी खेळाडूंशिवाय करावी लागणार आहे आणि हे कोणत्याच प्रँचायजीला आवडणार नाही. 1 एप्रिलपासून सुरुवात झाली तर हे खेळाडू उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे आयपीएलची गव्हर्निंग कौन्सिल या बाबींचा विचार करून योग्य तो निर्णय घेईल, अशी आशा करूया.’

आयपीएल जीसीला चाहत्यांच्या सोयीचा वेळ मिळावा यासाठी अधिक प्रमाणात दिवसा दोन सामने खेळविण्याचे टाळायचे आहे. पण प्रँचायजींना खुश करण्यासाठी कदाचित जास्तीत जास्त दोन सामने खेळविण्याचा जुना फॉरमॅट पुढेही ते चालू ठेवण्याची शक्यता आहे.

Related Stories

नव्या आयपीएल संघांसाठी 17 ऑक्टोबरला लिलाव

Patil_p

चेल्सी सुपर चषक फुटबॉल स्पर्धेतील विजेता

Amit Kulkarni

करुण नायर विवाहबद्ध

Patil_p

माजी विजेता इंग्लंड महिला संघ उपांत्य फेरीत

Patil_p

रोमांचक सामन्यात द.आफ्रिकेची 4 धावांची बाजी

Patil_p

चीनमधील सहा फुटबॉलपटूंवर बंदी

Patil_p
error: Content is protected !!