Tarun Bharat

आयपीएलमधील कॅरेबियन खेळाडू मायदेशी परतले

Advertisements

किंग्स्टन / वृत्तसंस्था

अवघ्या 4 आठवडय़ातच आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागल्यानंतर यात सहभागी झालेले विंडीजचे खेळाडू सुरक्षितरित्या मायदेशी पोहोचले आहेत, अशी माहिती क्रिकेट विंडीजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह यांनी दिली. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना खेळाडू व पदाधिकाऱयांना लागण होत राहिल्याने यंदाची आयपीएल 4 मे रोजी अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली गेली.

विंडीजचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार केरॉन पोलार्ड, जेसॉन होल्डर, सुनील नरेन, आंद्रे रसेल, डेव्हॉन ब्रेव्हो, निकोलस पूरन, शिमरॉन हेतमेयर, फॅबियन ऍलन यांचा यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सहभाग होता.

चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी व केकेआरचा किवीज फलंदाज टीम सेफर्ट यांचा अपवाद वगळता स्पर्धेत सहभागी सर्व विदेशी खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्य आता आपापल्या मायदेशी परतले आहेत किंवा भारतातून रवाना झाले आहेत.

सर्व ऑस्ट्रेलियन सदस्य व काही न्यूझीलंडचे सदस्य सध्या मालदीवमध्ये थांबले असून ते पुढील प्रवासाच्या प्रतीक्षेत आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱया प्रवाशांवर दि. 15 मे पर्यंत बंदी लादली असून यामुळे ऑस्ट्रेलियाचे पथक ताटकळले आहे. ही बंदी मागे घेतल्यानंतरच त्यांना मायदेशी परतता येईल, असे सध्याचे चित्र आहे.

वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर घरी पोहोचले

नवी दिल्ली ः केकेआरचा लेगस्पिनर वरुण चक्रवर्ती व मध्यमगती गोलंदाज संदीप वॉरियर सक्तीचे आयसोलेशन पूर्ण केल्यानंतर आपापल्या घरी पोहोचले आहेत. सध्या स्थगित केल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत वरुण व संदीप हे सर्वप्रथम कोरोनाबाधित झाले होते.

तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीनंतर संदीप वॉरियर व संघसहकारी प्रसिद्ध कृष्णा यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. केरळस्थित वॉरियरशी संवाद साधणारा दिल्लीचा अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह झाला. त्यानंतर खेळाडू, सदस्य पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढत गेले आणि पुढे ही स्पर्धाच स्थगित करावी लागली. केकेआरमधील किवीज खेळाडू टीम सेफर्ट हा देखील कोरोना झाल्यानंतर अद्याप आयसोलेशनमध्येच आहे.

Related Stories

वनडे मालिकेसाठी डु प्लेसिसला विश्रांती

Patil_p

बजरंग पुनिया, विनेश फोगटवर ‘स्पॉटलाईट’

Patil_p

24 मे रोजी आयपीएलची अंतिम लढत

Patil_p

कर्णधार बवुमा टी-20 मालिकेतून बाहेर

Patil_p

भारत की पाकिस्तान? फैसला आज!

Patil_p

सिंगापूर ओपनमध्ये पीव्ही सिंधूने पटकावले विजेतेपद

datta jadhav
error: Content is protected !!