Tarun Bharat

आयपीएलसाठी 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

2021 आयपीएल आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव दि. 18 फेब्रुवारी रोजी होऊ शकेल, अशी माहिती बीसीसीआय पदाधिकाऱयांनी शुक्रवारी दिली. हा लिलाव कुठे होईल, हे अद्याप निश्चित होणे बाकी आहे. अगदी ही स्पर्धा भारतातच होईल की गतवर्षाप्रमाणे विदेशात खेळवली जाईल, याचाही निर्णय होणे अपेक्षित आहे. यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी आगामी आयपीएल भारतातच खेळवण्याचे आपले पूर्ण प्रयत्न असतील, असे म्हटले होते.

कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे 2020 मधील आयपीएल स्पर्धेची आवृत्ती सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत भरवली गेली होती. पुढील महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध पूर्ण मालिका खेळणार आहे. ही मालिका निर्विघ्नपणे पार पडली तर आयपीएल स्पर्धा भारतातच भरवण्यासाठी तो हिरवा कंदील असेल, असे सध्याचे स्पष्ट संकेत आहेत.

विविध आयपीएल प्रँचायझींनी आपल्याला आवश्यक खेळाडू संघात कायम ठेवण्याची मुदत दि. 20 जानेवारीपर्यंत होती. त्या दिवशी सर्व संघांनी आपली यादी जाहीर केली आहे. स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांना अनुक्रमे राजस्थान रॉयल्स व किंग्स इलेव्हन पंजाब या संघांनी आपल्या करारातून मुक्त केले. स्पर्धेतील आगामी हंगामात खेळाडूंची परस्पर संमतीने अदलाबदल करण्याची मुदत दि. 4 फेब्रुवारीपर्यंत आहे.

रॉबिन उत्थप्पाचा चेन्नई सुपरकिंग्समध्ये समावेश

आयपीएल 2021 साठी रॉबिन उत्थप्पाला चेन्नई सुपरकिंग्सने ट्रेड केले. ‘ऑल कॅश’ स्वरुपात हा ट्रेड झाला. 35 वर्षीय रॉबिन उत्थप्पा यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व करत होता. याशिवाय, तो मुंबई इंडियन्स, आरसीबी, पुणे वॉरियर्स, केकेआरकडूनही खेळला आहे. राजस्थान रॉयल्सने गतवर्षी त्याला 3 कोटी रुपयांच्या बोलीसह करारबद्ध केले होते.

आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर उत्थप्पा प्रत्येक वर्षी खेळला असून त्याने स्पर्धेच्या इतिहासात 189 सामन्यात 4607 धावा जमवल्या आहेत. यादरम्यान त्याने 129.99 चा स्ट्राईक रेट नोंदवला. त्याने 24 अर्धशतके झळकावली, त्याचप्रमाणे 2014 मधील स्पर्धेत तो ऑरेंज कॅपचा मानकरीही ठरला. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मात्र त्याला 12 सामन्यात 119.51 च्या स्ट्राईक रेटने केवळ 196 धावा जमवता आल्या.

चेन्नईने शेन वॅटसन व मुरली विजय हे दोन सलामीवीर आता संघात नसल्याने उत्थप्पाला ट्रेड केले असल्याचे मानले जाते. अर्थात, त्यांच्याकडे सलामीसाठी फॅफ डय़ू प्लेसिस, अम्बाती रायुडू, ऋतुराज गायकवाड, एन. जगदीशन व सॅम करण असे पर्यायही उपलब्ध असणार आहेत.

Related Stories

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मीराबाई चानूला सिल्वर मेडल

datta jadhav

लंकेचा ऑस्ट्रेलियावर सहा गडय़ांनी दणदणीत विजय

Patil_p

दुसऱ्या कसोटीवर भारताचे वर्चस्व

Patil_p

शार्दुलच्या दुखापतीमुळे अश्विनला संधी शक्य

Patil_p

साई प्रणित, आकर्षी यांना बॅडमिंटनचे सुवर्ण

Patil_p

बोस्नियाकडून 2 हजार फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीला परवानगी

Patil_p
error: Content is protected !!