Tarun Bharat

आयपीएल क्रिकेटचा सट्टा चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

38 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


प्रतिनिधी / सोलापूर

आयपीएल क्रिकेटमॅच मधील षटकार, चौकारांवर हजारो रुपयांचा सट्टा घेणाऱ्या टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून या सट्याचे नियंत्रण केले जात होते. आयपीएल सट्टा खेळण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य तसेच इतर वस्तूंसह पोलिसांनी 38 लाख 44 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 चेतन रामचंद्र वन्नाल (वय 26, रा. गांधिनगर झोपडपट्टी अक्कलकोट रोड सोलापूर ), ( विग्नेश नागनाथ गाजून वय 24, रा. भद्रावती पेठ सोलापूर), अतुल सुरेश शिरशेट्टी शेट्टी ( रा. अवंतीनगर सोलापूर) व प्रदीप मल्लय्या कारंजे,( भवानी पेठ सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅच वर सोलापुरातून सट्टा लावला जात होता.याप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील गुलबर्गा येथून आरोपी अतुल व प्रदीप यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सट्टा लावण्यासाठी वापरण्यात येणारे तीन लॅपटॉप 1 ते 13 मोबाईल एक माईक तीन लॅपटॉप हॉट लाईन मशीन तेरा जोडलेली मोबाईल मॉडेल सेटटॉप बॉक्स टीव्ही असा तीन लाख 33 हजार रुपयांचा व एक कार असा साधारण 38 लाख 44 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

सोलापुरातील अवंती नगर येथील पर्ल हाईट्स या इमारतीत 

 छापा टाकून चालू क्रिकेट मॅच पहात क्रिकेटचा टॉस कोण जिंकेल तसेच सहा, दहा, पंधरा व वीस ओव्हरमध्ये किती धावा निघतील व शेवटी कोणती टीम जिंकेल यावर मोबाईल द्वारे सट्टा लावणार्या तरुणांना ताब्यात घेतले.

कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त बापू बांगर साहेब पोलीस आयुक्त अभय डोंगरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे पोलीस हवालदार औदुंबर पाटोळे दिलीप नागटिळक पोलीस नाईक जयसिंग भाई पोलीस कर्मचारी संजय साळुंखे सिताराम देशमुख गणेश शिंदे सागर गुंड विद्यासागर मोहिते सोमनाथ सुरवसे अश्रूभान दुधाळ कुमार शेळके सनी राठोड सुरज देशमुख महिला पोलिस कर्मचारी आरती यादव पोलीस नाईक राहुल गायकवाड व नेताजी गुंड यांनी केली.

Related Stories

गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या पर्सवर चोरट्याचा डल्ला

Abhijeet Khandekar

सोलापूर शहरात मास्कची सक्ती करा – पालकमंत्री

Archana Banage

तडीपार गुंडाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून

datta jadhav

पालघर : घराला लागेल्या आगीत एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

Archana Banage

पालकमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर; कोरोना आढावा बैठक घेणार

Archana Banage

सोलापूर : पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा काढणारच

Archana Banage